T20 Word Cup: भारत-दक्षिण आफ्रिका आजवर 23 वेळा आमने-सामने, कोण ठरलंय वरचढ? आकडे काय सांगतात चेक करा

भारतीय संघाने 13 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे.
IND vs SA
IND vs SASaam Tv
Published On: 

T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 मध्ये आज भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा 24वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. याआधी झालेल्या 23 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. भारतीय संघाने 13 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे.

या 23 सामन्यांशी संबंधित आकडेवारी

सर्वोच्च धावसंख्या: टीम इंडियाने 2 ऑक्टोबर 2022 रोजी गुवाहाटी T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 237/3 अशी मोठी धावसंख्या उभारली होती.

सर्वात कमी धावसंख्या: 17 जून 2022 रोजी झालेल्या राजकोट T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त 87 धावांवर ऑलआऊट झाला होता.

सर्वात मोठा विजय: टीम इंडियाने 17 जून 2022 रोजी राजकोट T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव केला होता. (Sports News)

IND vs SA
T20 World Cup : फ्लॉप केएल राहुलऐवजी रिषभ पंत सलामीला येणार का? टीम इंडियाचा काय आहे नवा प्लान?

सर्वाधिक धावा: भारतीय कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 405 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 28.92 आणि स्ट्राईक रेट 130.22 आहे.

सर्वोत्कृष्ट धावसंख्या: डेव्हिड मिलरने 2 ऑक्टोबर 2022 रोजी गुवाहाटी T20 मध्ये 47 चेंडूत 106 धावांचे शानदार शतक झळकावले होते.

सर्वाधिक 50+ डाव: क्विंटन डी कॉकने भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात 4 वेळा 50+ धावा केल्या आहेत.

IND vs SA
टीम इंडिया करणार पाकिस्तानचा दौरा, 15 वर्षानंतर असं का घडणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

सर्वाधिक षटकार: डेव्हिड मिलर येथे आघाडीवर आहे. मिलरने भारताविरुद्धच्या T20 मध्ये 23 षटकार ठोकले आहेत.

सर्वाधिक विकेट : हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: भुवनेश्वर कुमारने 18 फेब्रुवारी 2018 रोजी जोहान्सबर्ग T20 मध्ये 4 षटकात 24 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.

सर्वाधिक सामने: डेव्हिड मिलर हा सर्वाधिक वेळा भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यांचा भाग आहे. त्याने 23 पैकी 17 सामने खेळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com