ICC Test Rankings: जयस्वालची ICC Rankings मध्ये यशस्वी झेप! रोहितलाही सोडलं मागे

Yashasvi Jaiswal ICC Test Rankings: आयसीसीने नुकताच कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे.
star indian batsman yashasvi jaiswal moves to number 12 in icc latest test rankings know rohit sharma virat kohli ranking
star indian batsman yashasvi jaiswal moves to number 12 in icc latest test rankings know rohit sharma virat kohli ranking saam tv news
Published On

Latest ICC Test Rankings:

आयसीसीने नुकताच कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याच्याकडे कसोटी रँकिंगमध्ये विराट कोहलीला मागे सोडण्याची संधी असणार आहे.

यशस्वी जयस्वाल आता कसोटी रँकिंगमध्ये १२ व्या स्थानी पोहोचला आहे. तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या यादीत १२ व्या स्थानी आहे. विराटला मागे टाकण्यापासून यशस्वी जयस्वाल केवळ ३ पावलं दूर आहे. यशस्वी जयस्वालची रेटिंग ७२७ आहे. तर विराट कोहलीची रेटिंग ७४४ इतकी आहे.

star indian batsman yashasvi jaiswal moves to number 12 in icc latest test rankings know rohit sharma virat kohli ranking
IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

टॉप ५ मध्ये एकही भारतीय नाही..

आयसीसी रँकिंगमधील टॉप ५ फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर या यादीत केन विलियम्सन अव्वल स्थानी कायम आहे. केन विलियम्सनचे रेटिंग पॉईंट्स ८९३ इतके आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ ८१८ रेटिंग पॉईंट्ससह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट ७९९ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डॅरील मिशेल ७८० रेटिंग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आणि पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम ७६८ रेटिंग पॉईंट्ससह या यादीत पाचव्या स्थानी आहे. (Cricket news in marathi)

star indian batsman yashasvi jaiswal moves to number 12 in icc latest test rankings know rohit sharma virat kohli ranking
IND vs ENG: धरमशाला कसोटीत जॉनी बेअरस्टोला इतिहास रचण्याची संधी! दिग्गज खेळाडूंच्या यादीत करणार प्रवेश

इंग्लंडविरुद्ध जयस्वालची शानदार फलंदाजी..

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये ९३.५७ च्या सरासरीने ६५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ दुहेरी शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com