यशस्वी जयस्वाल हे नाव सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इंग्लंडविरुद्ध खेळताना बॅक टू बॅक सामन्यांमध्ये २ दुहेरी शतकं. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये त्याने ५४५ धावा केल्या आहेत.
या दमदार कामगिरीचा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. तो या रँकिंगमध्ये १५ व्या स्थानी पोहोचला आहे. यासह वनडे रँकिंगंमध्येही भारतीय संघातील ३ खेळाडूंनी टॉप ५ मध्ये प्रवेश केला आहे.
कसोटी आणि रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी मोठी झेप घेतला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत त्याने दुहेरी शतकं झळकावली आहेत. विशाखापट्टनमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने २०९ धावांची खेळी केली होती. तर राजकोटच्या मैदानावर त्याने नाबाद २१४ धावांची खेळी केली. मालिकेतील पहिल्या कसोटीत तो ८० धावा करत माघारी परतला होता. (Cricket news in marathi)
हे आहेत टॉप ५ फलंदाज...
कसोटीतील टॉप ५ फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर,केन विलियम्सन ८९३ रेटिंग पॉईंटसह अव्वल स्थानी आहे. तर ८१८ रेटिंग पॉईंटसह स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. ७८० रेटिंग पॉईंटसह डॅरील मिशेल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. बाबर आझम तच ७६८ रेटिंग पॉईंटसह चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट ७६६ रेटिंग पॉईंटसह या यादीत पाचव्या स्थानी आहे.
तसेच वनडे रँकिंगबद्दल बोलायचं झालं तर, भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ८०१ रेटिंग पाँईंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर विराट कोहली ७६८ रेटिंग पाँईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा ७४६ रेटिंग पाँईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम या यादीत अव्वल स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.