Srilanka vs Bangladesh: जे भारतालाही नाही जमलं ते श्रीलंकेने करून दाखवलं, बांगलादेशला पराभूत करत केलाय मोठा रेकॉर्ड

11th Consecutive Win For Srilanka: बांगलादेशला पराभूत करताच श्रीलंकेने वनडे क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे.
srilanka vs bangaldesh
srilanka vs bangaldesh saam tv
Published On: 

Srilanka vs Bangladesh Asia Cup 2023:

श्रीलंकेने आशिया चषकात विजयी सलामी देत दमदार सुरूवात केली आहे. गुरूवारी श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशी टायगर्सला धूळ चारत ५ गडी राखून विजय मिळवला आहे.

हा विजय श्रीलंकेसाठी अतिशय खास आहे. कारण या विजयासह श्रीलंकेने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

गेल्या ११ सामन्यांमध्ये श्रीलंकेने एकही सामना गमावलेला नाही. यासह वनडे क्रिकेटमध्ये सलग ११ वनडे सामने जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे.

srilanka vs bangaldesh
Most Runs In Asia Cup: आशिया चषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या नावे होता. यापूर्वी २००४ मध्ये श्रीलंकेने सलग १० वनडे सामने जिंकण्याचा कारनामा केला होता.

श्रीलंकेच्या कर्णधाराने या सामन्यानंतर बोलताना म्हटले की, 'मला असं वाटतं की, बांगलादेशी फलंदाजांनी ज्याप्रकारे फलंदाजी त्यामानाने ही फलंदाजी करण्यासाठी उत्तम होती. आपल्याला माहित आहे की, या विकेट्सचा वापर लंका प्रिमीयर लीग स्पर्धेसाठी केला जातोय. सदिराने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. असलंकाची कामगिरीही दमदार होती.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र श्रीलंकेचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली.

अवघ्या ११ धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने या खेळीदरम्यान ७ चौकार मारले.नजमुल हुसेन शांतोला वगळलं तर इतर कुठल्याही फंलदाजाला मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशचा संपूर्ण डाव ४२.४ षटकात अवघ्या १६४ धावांवर संपुष्ठात आला. (latest sports updates)

srilanka vs bangaldesh
Ind v Pak, Playing XI : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात! KL Rahul च्या जागी कोण?

श्रीलंकेला आपला पहिला सामना जिंकण्यासाठी ५० षटकात अवघ्या १६५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून चरीथ असलंकाने ९२ चेंडूंचा सामना करत नाबाद ६२ धावांची खेळी केली.

तर सदिरा समरविक्रमाने ७७ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा ३९ षटकात यशस्वी पाठलाग करून ५ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.