World Cup 2023: वर्ल्डकप तोंडावर असताना संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूचं कर्णधारपद जाणार

Dasun Shanaka Captaincy: वर्ल्डकप तोंडावर असताना दासून शनाकाला कर्णधारपदावरून काढलं जाऊ शकतं.
srilanka captain dasun shanaka may step down as a captain of srilanka before world cup 2023 cricket news in marathi
srilanka captain dasun shanaka may step down as a captain of srilanka before world cup 2023 cricket news in marathi saam tv
Published On

Dasun Shanaka Captaincy:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जवळजवळ सर्व संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

मात्र श्रीलंकेने अजुनही आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. संघाची घोषणा होण्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

srilanka captain dasun shanaka may step down as a captain of srilanka before world cup 2023 cricket news in marathi
IND vs AUS 2023, Schedule: आशिया चषकानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध करणार दोन हात; पाहा मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

नुकताच भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यातील अंतिम सामन्यात श्रीलंकेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानतंर श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांची चिंता आणखी वाढली आहे. माध्यमातील वृ्त्तानूसार वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असताना दासून शनाकाला कर्णधारपदावरून काढलं जाऊ शकतं.

या खेळाडूला मिळू शकते मोठी जबाबदारी..

दासून शनाका हा श्रीलंकेचा अनुभवी कर्णधार आहे. जर त्याला कर्णधारपदावरून काढलं तर त्याच्या जागी कर्णधारपद कोणाला मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर त्याच्याऐवजी धनजंय डी सिल्वाला कर्णधारपद दिले जाऊ शकते.

आगामी वर्ल्डकप स्पर्धेत धनजंय डी सिल्वा श्रीलंकेची जबाबदारी पार पाडताना दिसून येऊ शकतो. आतापर्यंत याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दासून शनाकाचं कर्णधारपद काढून घेतलं जाणार हे निश्चित आहे. (Latest sports updates)

srilanka captain dasun shanaka may step down as a captain of srilanka before world cup 2023 cricket news in marathi
Asian Games 2023: एशियन गेम्ससाठी टीम इंडिया सज्ज! केव्हा, कधी अन् कुठे रंगणार सामने?

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत श्रीलंकेचा पहिला सामना ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रंगणार आहे. तर दुसरा सामना १० ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे. तर पुढील सामने ऑस्ट्रेलिया,नेदरलँड, इंग्लंड, अफगाणिस्तान, भारत, बांगलादेश, न्यूझीलंड या संघांविरूद्ध रंगणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com