SRH VS PBKS : 6,6,6,6... पंजाबच्या धुरंधरांनी हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धूतले; तब्बल 'इतक्या' धावांचे तगडे आव्हान दिले

SRH VS PBKS Highlights : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यामध्ये टॉस जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पंजाब किंग्सने फलंदाजी करताना सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. विकेट्स पडूनही पंजाबने दमदार फलंदाजी केली.
SRH VS PBKS
SRH VS PBKSX
Published On

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद पंजाब किंग्स हा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आक्रमकपणे फलंदाजी करताना पंजाबच्या खेळाडूंना २० ओव्हर्समध्ये इतक्या धावा केल्या. आता हैदराबादच्या संघासमोर २४५ धावांचे लक्ष आहे.

पंजाब किंग्सची सुरुवात दमदार झाली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. प्रियांश आर्य ३५ धावा तर प्रभसिमरन सिंग ४२ धावा करुन माघारी परतले. नेहाल वढेराने २७ धावा केल्या. कॅप्टन अय्यरने सर्वाधिक अशा ८२ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये मार्कस स्टॉयनिसने देखील दमदार फटके मारले. शेवटच्या ओव्हरमध्ये सलग चार सिक्स मारत त्याने ३४ धावा केल्या.

SRH VS PBKS
CSK मध्ये वादाची ठिणगी? धोनी कर्णधार होताच ऋतुराजचं मोठं पाऊल, सोशल मीडियावरील कृतीतून चित्रच समोर आलं

हैदराबादच्या हर्षल पटेलने एकाच ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. प्रियांश आर्य आणि शशांक सिंहला देखील हर्षलने तंबूत पाठवले होते. ईशान मलिंगाने दोन विकेट्स घेतल्या. या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. मोहम्मद शमीने सर्वाधिक मार खाल्ला. त्याने चार ओव्हर्समध्ये ७५ धावा दिल्या.

SRH VS PBKS
Ricky Ponting : पंजाब किंग्सच्या खेळाडूंमुळे रिकी पाँटिंगवर 'कचरा' गोळा करण्याची वेळ; Video Viral

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मार्को जॅन्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन

SRH VS PBKS
Babar Azam : बिर्याणीवर ताव, मैदानावर बसला घाव; भोपळ्यावर बाद झालेल्या बाबर आझमला नेटिझन्सने धुतले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com