SRH Vs GT Highlights : हैदराबादचे शेर, गुजरातसमोर ढेर; SRH ने 152 धावांवर गाशा गुंडाळला

SRH VS GT Match Updates : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकत गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादने फक्त १५२ धावा केल्या. आता गुजरातसमोर १५३ धावांचे आव्हान आहे.
SRH Vs GT Highlights
SRH Vs GT Highlightsx
Published On

SRH VS GT Match Highlights : गुजरात टायटन्सच्या संघाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी केली. आजच्या सामन्यामध्ये गुजरातचे गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजांवर वरचढ ठरले. ट्रेव्हिड हेड, अभिषेक शर्मा ते हेनरिक क्लासेन असे सलामीपासून मध्यम फळीपर्यंतचे प्रमुख फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. पहिल्या इनिंगमध्ये गुजरातचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले. सनरायजर्स हैदराबादने ८ विकेट्स गमावून १५२ धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी सनरायजर्स हैदराबादचे खेळाडू मैदानामध्ये उतरले. हैदराबादच्या संघाने २० ओव्हर्समध्ये फक्त १५२ धावा केल्या.

SRH Vs GT Highlights
IPL 2025 सुरु असताना गुजरातच्या कर्णधारानं गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ती' तरूणी?

अभिषेक शर्माने १८ धावा, तर ट्रेव्हिस हेडने फक्त ८ धावा केल्या. पहिल्या सामन्यातला शतकवीर इशान किशन आज पुन्हा एकदा फेल झाला. क्लासेन २७ धावा करुन परतला. नितीश कुमार रेड्डी ३१ धावा करुन बाद झाला. अनिकेत वर्माची १८ धावांवर विकेट पडली. कर्णधार पॅट कमिन्सने शेवटच्या ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने एकूण २२ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोरने देखील प्रत्येकी २-२ गडी बाद केले. पहिल्या ओव्हरपासून गुजरातचे गोलंदाज हैदराबादवर दबाव टाकून होते. सलामीवीर बाद झाल्याने तो दबाव वाढत गेला. यामुळे मध्यम फळी खेळ पुढे नेताना त्रास झाला आणि लागोपाठ विकेट्स पडत गेल्या. एका वेळेला ३०० पारचा नारा देणाऱ्या हैदराबादचा कार्यक्रम १५३ धावांवर आटोपला.

SRH Vs GT Highlights
MS Dhoni : अखेर फैसला झालाच! एमएस धोनी निवृत्ती कधी घेणार? थालाने 'तो' क्षणच सांगितला

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग 11 :

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंदुने मेंडिस, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.

SRH Vs GT Highlights
Tilak Varma : लखनऊ विरुद्धच्या सामन्यातला 'तो' निर्णय महागात पडला, तिलक वर्मानं मोठं पाऊल उचललं, MI चं टेन्शन वाढवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com