SA vs NED: हमें तो अपनों ने लूटा...माजी खेळाडूनेच केला दक्षिण आफ्रिकेचा गेम

Roelof van der Merwe: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूनेच दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
Roelof van der Merwe
Roelof van der MerweSaam tv news
Published On: 

Roelof van der Merwe, SA vs NED:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दुसरा सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. धर्मशाळेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. हा या स्पर्धेतील नेदरलँडचा पहिला विजय आहे.

तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला पराभव आहे. हा दक्षिण आफ्रिकेचा तोच संघ आहे ज्या संघाने श्रीलंकेविरूद्ध खेळताना वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती.

मात्र नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांचा पाठलाग करू शकला नाही. नेदरलँडला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू खेळाडू रुलोफ वॅन डर मेरवेने मोलाची भुमिका बजावली आहे.

या सामन्यात नेदरलँडकडून सर्वच खेळाडूंनी दमदार खेळ केला. अनुभवी खेळाडू रुलोफ वॅन डर मेरवेने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना १९ चेंडूंचा सामना करत २९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ९ षटकात ३४ धावा खर्च करून २ गडी बाद केले. त्याने आपल्या गोलंदाजीदरम्यान कर्णधार टेंबा बावुमा आणि रासी वॅन डर डुसेनला बाद केलं होतं.

Roelof van der Merwe
Viral Cricket Video: नॉर्मल माणूस वाटलोय का? बुमराहच्या चेंडूवर रिजवानची बत्ती गुल्ल;पाहा Video

नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला बाद करण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापू्र्वी २०२२ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात रुलोफ वॅन डर मेरवेने मागच्या बाजूने धावत आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरचा झेल टीपला होता. या झेलमुळे दक्षिण आफ्रिकेचा हातचा विजय निसटला होता. (Latest sports updates)

Roelof van der Merwe
SA VS NED: इथेच आमचं चुकलं ..सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने सांगितलं लाजिरवाण्या पराभवाचं नेमकं कारण

दक्षिण आफ्रिकेचं केलंय प्रतिनिधित्व...

नेदरलँडकडून खेळत असलेल्या रुलोफ वॅन डर मेरवेने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. ३८ वर्षीय रुलोफ वॅन डर मेरवेचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी १३ वनडे आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. २०१५ मध्ये त्याने नेदरलँड संघासाठी पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने ५१ टी-२० आणि १९ वनडे सामने खेळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.