आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दुसरा सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. नेदरलँड संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघावर विजय मिळवला आहे. या विजयासह नेदरलँडने इतर सर्व संघांना, आम्हाला हलक्यात घेऊ नका अशी वॉर्निंग दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं.
आता त्याच दक्षिण आफ्रिका संघाला नेदरलँडने धूळ चारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दरम्यान या पराभवानंतर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावूमा म्हणाला की, ' ११२ वर ६ फलंदाजांना बाद केल्यानंतर आम्ही त्यांना २०० धावांच्या आत रोखायला हवं होतं. आम्ही क्षेत्ररक्षणात चुका करत झेल सोडल्या. त्यानंतरही आम्हाला विश्वास होता की, आम्ही हा सामना जिंकू शकतो. मात्र त्यांनी आमच्या फलंदाजीतील चुका शोधल्या.'
तसेच तो पुढे म्हणाला की,' या सामन्यात आम्ही अतिरिक्त धावांवर नियंत्रण ठेऊ शकलो असतो. या सामन्यात खेळाडूंनी हवं तसं क्षेत्ररक्षण केलं नाही, जसं आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केलं होतं. आम्हाला खेळाडूंसोबत चर्चा करावी लागेल. या सामन्यात खरचं दमदार खेळ केला. त्यांनी आम्हाला प्रत्येक क्षेत्रात दबावात ठेवलं. त्यामुळे त्यांचं अभिनंदन.' (Latest sports updates)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना ४३ -४३ षटकांचा खेळवण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने ८ गडी बाद २४५ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव ४२.५ षटकात २०८ धावांवर संपुष्टात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.