रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला. या सामन्याच्या निकालाचा मोठा धक्का भारतीय संघाला बसला. गुणतालिकेत प्रथम स्थानी असलेला भारतीय संघ दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. तर पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघानं पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवाचा 'सिलसिला' सुरूच आहे. पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका संघानं एक गडी राखून पराभूत केलं आहे.
चेन्नईच्या चिदंबरम मैदानात खेळल्या गेलल्या या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७१ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान त्यांनी ४८ व्या षटकांत पार केलं. केशव महाराजनं नवाजच्या चेंडूवर चौकार ठोकून विजय मिळवला. अॅडन मार्करम या विजयाचा खरा हिरो ठरला. त्याने ९३ चेंडूंत ९१ धावा केल्या. (Latest sports updates)
दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमधील हा पाचवा विजय आहे. या विजयासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी १० गुण आहेत. मात्र, नेट रनरेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेत प्रथम स्थानी झेप घेतली. भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असून, न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका सहा सामने खेळला असून, त्यात पाच विजय मिळवले आहेत. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. नेट रनरेटमुळे १० गुणांसह दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी आहे. तर भारतानं पाच सामने खेळले असून, सर्व सामने जिंकले आहेत.
१० गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे. आठ गुणांसह न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे ५ सामन्यांत ६ गुण, श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे ४ गुण आहेत. बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलँड यांचे प्रत्येकी २ गुण आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.