Sourav Ganguly Statement: 'भारताविरूद्ध ते पण अहमदाबादेत..', हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी गांगुलीची पाकिस्तानला वॉर्निंग

Sourav Ganguly On India vs pakistan match : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी सौरव गांगुलींनी पाकिस्तानला मोठी वॉर्निंग दिली आहे.
sourav ganguly
sourav gangulysaam tv
Published On

Sourav Ganguly On India vs Pakistan Match:

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना येत्या २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. तर १४ ऑक्टोबर रोजी हे दोन्ही संघ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध दोन हात करताना दिसून येणार आहेत.

त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत होणारा सामना हा हाय व्हॉल्टेज सामन्यापूर्वीचा ट्रेलर असणार आहे. दरम्यान या सामन्यापू्र्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी पाकिस्तानला वॉर्निंग दिली आहे.

sourav ganguly
IND vs PAK, Asia Cup 2023: विराट ते रोहित ...भारत- पाकिस्तान सामन्यात या ५ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

रेवस्पोर्ट्सवर बोलत असताना सौरव गांगुली यांनी शाहिन आफ्रिदीबाबत बोलताना म्हटले की, 'तो एक चांगला गोलंदाज आहे.मात्र त्याचा अर्थ असा मुळीच नाही की, त्याच्याविरूद्ध खेळता येणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक संघात तुम्हाला असे २ गोलंदाज मिळतील. पाकिस्तानात शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह, ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड, न्यूझीलंडमध्येही काही गोलंदाज आहेत. मात्र या गोलंदाजांचा सामना करण्यास भारतीय संघात फलंदाज आहेत.'

तसेच ते पुढे म्हणाले की,'मी अनेकदा म्हटलं आहे की,मोठ्या स्पर्धा तोंडावर असताना संघात बदल करू नये. एका संघाला कमीत कमी १ ते दिड वर्ष एकत्र ठेवा. जे जिकंताय किंवा पराभूत होताय हे महत्वाचं नाही, ते संघ म्हणून तयार असणं गरजेचं आहे. १९९९ पासून ते २००३ पर्यंत ऑस्ट्रेलियाने संघात काहीच बदल केला नव्हता. हेच कारण आहे की, ते इतके चांगले खेळत होते. (Latest sports updates)

sourav ganguly
Asia Cup 2023: पाकिस्तानविरूद्ध ईशान नव्हे तर संजू का आहे परफेक्ट चॉईस? दोघांचा रेकॉर्ड एकदा पाहाच

'गतवर्षी दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघावर विजय मिळवला होता. या सामन्यानंतर गोष्टी बदलल्या आहेत. पाकिस्तानचा संघ मजबूत संघ आहे. पाकिस्तान संघात दर्जेदार खेळाडू आहेत. मात्र भारतात येऊन भारतीय संघाविरूद्ध खेळणं, भारतीय संघाविरूद्ध अहमदाबादमध्ये खेळणं, तेही ११०००० प्रेक्षकांसमोर ही खूप कठीण गोष्ट आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com