Sonu Sood- Hardik Pandya: 'देशाच्या हिरोंना अशी वागणूक...'. IPL मध्ये ट्रोल होणाऱ्या हार्दिक पंड्याला सोनू सूदचा पाठिंबा! पोस्ट व्हायरल

Ipl 2024: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच क्रिकेट चाहत्यांमध्ये या स्पर्धेती क्रेझ पाहायला मिळत आहे.
Sonu Sood- Hardik Pandya
Sonu Sood- Hardik Pandyasaam digital

Sonu Sood Shows His Support For Hardik Pandya

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच क्रिकेट चाहत्यांमध्ये या स्पर्धेती क्रेझ पाहायला मिळत आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आयपीएलच्या संघांमध्ये लहान मोठे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. या हंगामात मुंबई(Mumbai) इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एकीकडे ट्रोल असताना बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याला पाठिंबा देताना दिसून आला आहे.

Sonu Sood- Hardik Pandya
IIT मध्ये शिक्षण घ्यायचंय? या शैक्षणिक वर्षापासून Sports Quota! #iit #iitjee #engineering

आयपीएल २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमाचंक सामने सुरु आहेत. काही संघात नवीन खेळाडू(Player) खेळताना दिसताय. तर काही संघांचे थेट कर्णधारच बदलले आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा बदल म्हणजे हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद दिलं गेलं आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय मुंबई इंडिनन्सच्या चाहत्यांना पटलेला नाही. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं आहे.

एकीकडे रोहित शर्माचे समर्थक हार्दिक पंड्याला ट्रोल करताना दिसून येत आहे. अशातच अभिनेता सोनू सूदचे हार्दिकला समर्थन करणारे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याने या ट्वीटद्वारे हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. हार्दिकला पाठिंबा देताना त्याने कुणाचंह नाव घेतलेलं नाही. मात्र या ट्वीटमध्ये त्याने हार्दिक पंड्याच्या नुकत्याच झालेल्या सामन्याचा विशेष उल्लेख केला आहे.

या ट्वीटमध्ये सोनू सूदने लिहिले की,' आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंनी देशाचा गौरव केला,त्यांचा आपल्याला अभिमान असायला हवा. एक दिवस तुम्ही त्यांचा जयजयकार करता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना ट्रोल करता. अपयशी लोकं नाही तर आपणच आहोत. मला क्रिकेट खूप आवडते तसेच मला आपल्या देशातील प्रत्येक खेळाडूचा खूप अभिमान आहे. तो कोणत्या संघासाठी खेळतोय याने काही फरक पडत नाही. तो कर्णधार म्हणून खेळतोय की संघाचा खेळाडू याने काही फरक पडत नाही. हे सर्व खेळाडू आमचे हिरो आहेत'.

अभिनेता सोनु सूदने केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसून येत आहे. काहींनी सोनू सूदला समर्थन केलं आहे. तर काहींनी रोहित शर्माला पाठिंबा देत हार्दिक पंड्याची वागणूक चुकीचं असल्याचं म्हटलं आहे

Sonu Sood- Hardik Pandya
Sports News : पुरस्कारावरून न्यायालयाचा सरकारला सज्जड दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com