Smriti Mandhana: 'माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...', लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; पाहा VIDEO
Smriti MandhanaSAAM TV

Smriti Mandhana: 'माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...', लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; पाहा VIDEO

Smriti Mandhana On Wedding: महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्मृती मानधनाने प्रेमाबद्दल प्रतिक्रिया दिली. तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on

Summary -

  • स्मृती मानधनाचे संगीतकार पलाश मुच्छलसोबतचे लग्न मोडले

  • लग्नानंतर पहिल्यांदाच स्मृती मानधना एका कार्यक्रमात दिसली

  • माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम क्रिकेट असल्याचे स्मृतीने स्पष्ट केले

  • दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न रद्द करण्यात आले असल्याचे तिने सांगितले होते

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. स्मृती मानधनाचे संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. पण त्यांचे लग्न अचानक मोडले. लग्न मोडल्यानंतर स्मृती माधनधा पहिल्यांदाच मीडियासमोर आली आणि तिने लग्नासंदर्भातील मौन सोडले. स्मृती मानधना महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात स्मृतीने 'माझे पहिले आणि शेवटचे प्रेम क्रिकेट' असल्याचे सांगितले. स्मृतीच्या मुलाखचीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील ॲमेझॉन संभव परिषदेत स्मृती मानधना सहभागी झाली होती. लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच स्मृती या कार्यक्रमाद्वारे सर्वांसमोर आली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या मंदिरा बेदी यांनी स्मृतीला अनेक प्रश्न विचारले. आयुष्यात चढ-उतार असूनही तू क्रिकेटवर कशापद्धतीने लक्ष केंद्रीत करते असा प्रश्न स्मृतीला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना स्मृतीने स्पष्टपणे सांगितले की, 'मला नाही वाटत की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते.'

Smriti Mandhana: 'माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...', लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; पाहा VIDEO
Smriti Mandhana : पलाशने दिलेली साखरपुड्याची अंगठी स्मृतीच्या बोटातून गायब, 'तो' VIDEO होतोय व्हायरल

स्मृती मानधना यावेळी म्हणाली की, 'मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते. सतत प्रेरणादायी ठरणारी भारतीय जर्सी परिधान केली तर तुम्ही तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवता आणि जीवनावर लक्ष केंद्रीत करता.' काही दिवसांपूर्वीच स्मृती मानधनाने खुलासा केला होता की, पलाश मुच्छलसोबतचे तिचे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने रद्द करण्यात आले होते. ७ डिसेंबर रोजी स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये तिने चाहते आणि माध्यमांकडून गोपनीयतेची विनंती केली आणि ती हे प्रकरण इथेच थांबवू इच्छित असल्याचे सांगितले होते.

Smriti Mandhana: 'माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...', लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; पाहा VIDEO
Palash Muchhal-Smriti Mandhana: पलाशने प्रपोजल व्हिडिओ केला डिलीट; नाराज चाहते म्हणाले, 'स्मृतीसाठी आम्ही तुला माफ करणार...'

दरम्यान, स्मृती मानधनाचे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी होणार होते. पण लग्नाच्या दिवशी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पलाश मुच्छलचे काही फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे आणि लग्न पुढे ढकलण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दोघे लवकर लग्न करतील असे बोलले जात होते. नंतर स्मृती आणि पलाश या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे जाहीर केले होते.

Smriti Mandhana: 'माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...', लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; पाहा VIDEO
Smriti Mandhana: लग्न मोडलं, हृदय तुटलं पण खचली नाही, स्मृतीने केली नव्याने सुरुवात, भावाने शेअर केला फोटो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com