दुर्देवी! क्रिकेट खेळताना खेळाडूचा दुर्देवी मृत्यू; चक्कर आल्यानं तरूण खाली कोसळला अन्...

Sudden Death on Cricket Ground in Solapur: सोलापुरात क्रिकेट खेळताना ४२ वर्षीय तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तरूणाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
Sudden Death on Cricket Ground in Solapur
Sudden Death on Cricket Ground in SolapurSaam
Published On

सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेट खेळत असताना अचानक एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळत असताना तरूणाला अचानक चक्कर आली. भोवळ आल्यानंतर तो तरूण जमिनीवर कोसळला. उपस्थितीत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तरूणाचा मृत्यू झाला.

नरेंद्र गुडशेलू (वय वर्ष ४२) असे मृत तरूणाचे नाव आहे. ते सुरेश नगर कुमठा नाका सोलापूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. काल सांयकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नरेंद्र त्याच्या मित्रासह सोलापुरातील होम मैदानावर आपल्या मित्रासह क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना नरेंद्रला अचानक अस्वस्थ वाटू लागला. त्याला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर तरूण जमिनीवर कोसळला.

Sudden Death on Cricket Ground in Solapur
उठता - बसता हाडांचा कटकट आवाज येतो? तिशीतच गुडघेदुखीनं त्रस्त; किचनमधील खा 'हा' पदार्थ, व्हाल फिट

क्रिकेट खेळण्यासाठी आलेले मित्र नरेंद्रला घेऊन तातडीने रूग्णालयात गेले. मात्र, उपचारापूर्वीच नरेंद्रचा दुर्देवी मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर नरेंद्र गुडशेलू यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Sudden Death on Cricket Ground in Solapur
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्याचा अपघाती मृत्यू; पक्षावर दुखा:चा डोंगर

धुळ्यात पतंग उडवताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पतंग उडवत असताना एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पंतग उडवत असताना तीन मजली इमारतीवरून पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. रक्षित प्रभाकर पाटील असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी घरातून शाळेच्या दिशेनं जात होता. मात्र,

तो पंतग उडवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तीन मजली इमारतीवरून पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीचे काम सुरू असून, घटने दिवशी मजूर कामावर नसल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com