IPL सामना सुरू असताना मैदानात बसून सट्टेबाजी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

हे सट्टेबाज थेट IPL सामने सुरू असताना मैदानात सामना पाहत सट्टेबाजी करत होते.
crime news
crime newsSaamTVNews
Published On

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आयपीएल च्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केलंय. हे सट्टेबाज थेट आयपीएल सामने सुरू असताना मैदानात सामना पाहत सट्टेबाजी करत होते. सट्टेबाज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यावेळी डी वाय पाटील मैदानातून सट्टेबाजी करणार असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेला भेटली होती.

हे देखील पाहा :

या माहितीच्या आधारे सट्टेबाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवत सापळा रचून नवी मुंबई गुन्हे शाखेने तब्बल 8 सट्टेबाजांना अटक केली. तर काही सट्टेबाज पसार देखील झाले. यासोबतच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईदीप लॉज वर छापा मारून 4 सट्टेबाजांना देखील अटक करण्यात आलीय. हे सट्टेबाज चौकार षटकार विकेट यावर सट्टा लावत होते. नवी मुंबई गुन्हे शाखेने एकूण 12 सट्टेबाजांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल सोबत 10 ते 12 मोबाईल आणि डोंगल जप्त करण्यात आलेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com