Shubman Gill: अटीतटीचा सामना एका रनने जिंकला; तरीही शुभमन गिलला का बसला 12 लाखांचा दंड

Shubman Gill Fined ₹12 Lakh: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा एका रनने पराभव केला. मात्र स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार शुभमन गिलवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. राशिद खानच्या शानदार गोलंदाजीमुळे गुजरातला विजय मिळाला.
Shubman Gill Fined ₹12 Lakh
Shubman Gill Fined ₹12 Lakhsaam tv
Published On

आयपीएलमध्ये बुधवारी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा एका रनने पराभव केला. या सामन्यात गुजरात टीमचा कर्णधार शुभमन गिलसोबत तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. ज्यामुळे टीमला २१० रन्सचा डोंगर उभा करण्यास मदत झाली. मात्र विजयानंतर देखील गिलवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला. शुभमनला हा दंड का बसलाय ते पाहूयात.

का ठोठावला गिलवर दंड?

स्लो ओव्हर रेटमुळे शुभमन गिलवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हरचा वेग कमी ठेवल्यामुळे गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवर दंड आकारण्यात आला आहे. हा त्याच्या टीमचा या सिझनमधील आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 अंतर्गत पहिला गुन्हा होता. त्यामुळे गिल याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Shubman Gill Fined ₹12 Lakh
David Warner: डेव्हिड वॉर्नरला अटक; क्रिकेट विश्वात खळबळ, नेमकं कारण काय?

जर गुजरात टायटन्सने अशी चूक पुन्हा केली तर कर्णधार गिलला २४ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर इम्पॅक्ट प्लेअर आणि प्लेइंग ११ मधील खेळाडूंना प्रत्येकी १२ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. मात्र, तिसऱ्यांदा चूक केल्यास शुभमन गिलवर थेट एका सामन्याची बंदी घालण्यात येणार आहे.

Shubman Gill Fined ₹12 Lakh
DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

डेव्हिड मिलरच्या मेहनतीवर पाणी

दिल्ली कॅपिटल्सने १० ओव्हरच्या आतच १०० रन्सचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी जवळपास दिल्लीचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र एकापाठोपाठ एक विकेट पडल्याने दिल्ली मागे पडली. डेव्हिड मिलरने त्याच्या झुंजार खेळीने दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं पण शेवटच्या बॉलवर त्याला मोठा फटका मारता आला नाही.

Shubman Gill Fined ₹12 Lakh
डेव्हिड मिलरला अश्रू अनावर! दिल्लीला शेवटच्या २ चेंडूंत २ धावा हव्या होत्या; पण गुजरातने जबड्यातून विजय हिसकावला, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान गुजरातच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो राशिद खान. रशीद खानने त्याच्या चार ओव्हर्समध्ये केवळ १७ रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. त्याने नितीश राणा (५), समीर रिझवी (०) आणि अक्षर पटेल (२) या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. रिझवीने मागील दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती, पण रशीदने त्याला या सामन्यात मोठा स्कोर करण्याची संधी दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com