Shubman Gill Record : शुभमन गिलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; जे विराट-रोहितला जमलं नाही ते करून दाखवलं!

Shubman Gill IPL Record : गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Shubman Gill IPL Record
Shubman Gill IPL RecordSaam TV
Published On

Shubman Gill IPL Record : गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये जे रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना यांना जमलं नाही, ते शुभमन गिलने एका झटक्यात करून दाखवलं आहे. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकात्ता नाईट राईडर्सचा सामना सुरू आहे. या सामन्यात शुभमन गिलने ही कामगिरी केली आहे.  (Latest sports updates)

Shubman Gill IPL Record
Jofra Archer Injury : जोफ्रा आर्चर आयपीएल २०२३ मधून बाहेर? फिटनेसबाबत रोहित शर्माने दिली महत्वाची अपडेट

शुभमन गिलने रचला इतिहास

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल ३१ चेंडूत ३९ धावा काढून बाद झाला. यादरम्यान, त्याने आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. शुभमन गिलने रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, संजू सॅमसन यांना मागे टाकलं.

मात्र, तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या मागे पडला. आयपीएलमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. वयाच्या २३ वर्षे २३ दिवसात ऋषभने ही कामगिरी केली आहे. शुभमन गिलने २३ वर्षे २१४ दिवसांत २००० धावा पूर्ण केल्या आहेत.

याआधी संजू सॅमसनने २४ वर्षे १४० दिवस आणि विराट कोहलीने वयाच्या २४ वर्षे १७५ दिवसांत २००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर सुरेश रैनाने वयाच्या २५ वर्षे १५५ दिवसात २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

शुभमन गिलने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने १६ सामन्यात ४ अर्धशतकांच्या मदतीने ४८३ धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी ३४.५० इतकी होती. २०२१ मध्ये त्याने ४७८ आणि २०२० मध्ये ४४० धावा केल्या होत्या.

२०२२ पूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. शुभमनने यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरूवात सुद्धा धडाक्यात केली आहे. त्याने ३ सामन्यात १ अर्धशतक झळकावलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com