BCCI Award: शुभमन गिल ठरला Indian Cricketer Of The Year; BCCI रवी शास्त्रीलाही देणार विशेष पुरस्कार

Shubman Gill : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याची बीसीसीआयने वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड केलीय. हैदराबाद येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात बीसीसीआय त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. तसेच बीसीसीआय रवी शास्त्री यांनाही विशेष पुरस्कार देणार आहे.
BCCI Award
BCCI AwardSaam Tv
Published On

Shubman Gill Became Indian Cricketer Of The Year:

बीसीसीआय दरवर्षी पुरस्कार देते ज्यामध्ये वर्षभर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जातो. मागील वर्षात गिलची दमदार कामगिरी लक्षात घेऊन बीसीसीआयने त्याची वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड केलीय. बीसीसीआयने या भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला विशेष पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी हैदराबाद येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गिलचा गौरव केला जाणार आहे.(Latest News)

यासह बीसीसीआय भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक (Former coach) रवी शास्त्री यांनाही विशेष पुरस्कार देणार आहे. बीसीसीआयने शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. शास्त्री हे २०१७ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. गिलने २०२३ मध्ये सहा कसोटी सामने खेळले ज्यात त्याने २८.६६ या सरासरीने त्याने २५८ धावा केल्या.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या काळात त्याच्या बॅटमधून शतक झाले. गिलने २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्येही दमदार फलंदाजी केलीय. या फॉरमॅटमध्ये गिलने २९ सामने खेळले यात त्याने ६३.३६ च्या सरासरीने १५८४ धावा केल्या. गिलने यावर्षी ५ शतकं आणि नऊ अर्धशतकं केली आहेत.

शास्त्रींना मिळेल लाइफ टाईम अचिव्हमेंट

बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचे (Team India) माजी प्रशिक्षक आणि कर्णधार रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट देण्याचा निर्णय घेतलाय. शास्त्री प्रशिक्षक असताना टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली होती. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातृभूमीत पराभूत केलं होतं. कसोटी मालिकेत सलग दोनदा ऑस्ट्रेलियाला (Australia) पराभवाची चव चाखायला लावली होती.

तसेच परदेशात टीम इंडियाने दमदार कामिगिरी केली होती. शास्त्रींच्या कार्यकाळात टीम इंडियाने वर्ल्डकप २०१९ची उपांत्य फेरी गाठली होती. यापूर्वी २०१४ मध्ये शास्त्री संघाचे संचालक बनले होते. दरम्यान शास्त्री यांनी भारतासाठी ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळलेत. १९८१ ते १९९२ पर्यंत ते भारताकडून क्रिकेट खेळलेत.

BCCI Award
ICC Men's T20I Team: आयसीसीने निवडली 2023 वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-20 टीम, सूर्यकुमार यादवकडे संघाचं नेतृत्व

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com