
आयसीसीने २०२३ साली सर्वोत्कृष्ट टी-२० संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवलं आहे. या संघात यशस्वी जयस्वाल , रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंगचा देखील सामावेश आहे. (Latest Marathi News)
आयसीसीच्या संघाच चार भारतीय खेळाडूंचा सामावेश आहे. तर झिम्बाब्वे संघाचे दोन , वेस्ट इंडिजचा एक, इंग्लंडचा एक, आयर्लंडचा एक आणि न्यूझीलंडचा एक खेळाडूचा सामावेश आहे. विशेष म्हणजे या संघात यूंगाडाच्या एका खेळाडूचाही सामावेश आहे. तर या संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा सामवेश नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आयसीसीने टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, फलंदाज सूर्यकुमार यादव, रवी बिश्णोई आणि गोलंदाज अर्शदीप यांची संघात निवड केली आहे. तसेच याबरोबर न्यूझीलंडचा मार्क चॅपमन , आयर्लंडचा अष्टपैलू मार्क आदीर यांचाही संघात सामावेश आहे.
तर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा आणि गोलंदाज रिचर्ड नगारवाचा देखील संघात सामावेश करण्यात आला आहे. तसेच इंग्लंडच्या फिल सॉल्टमध्येही संघाचा सामावेश झाला आहे.
आयसीसी तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघ निवडते. आयसीसी प्रत्येक फॉरमॅटमध्ये एक सर्वोत्तम खेळाडू देखील निवडते.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, यशस्वी जयसवाल, फिल सॉल्ट, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा, अर्शदीप सिंग निकोलस पूरन,अल्पेश रमजानी, मार्क आदिर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.