Mumbai Open 2024: हैदराबादच्या श्रीवल्लीचा मुंबई ओपन स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रवेश; नाओ हिबिनोला देणार आव्हान

Shrivalli Bhamidipaty: भारताची स्टार टेनिसपटू श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने पात्रता फेरीतील सामन्यात सुरेख खेळाचे प्रदर्शन करत या स्पर्धेतील मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे
 Shrivalli Bhamidipaty
Shrivalli Bhamidipaty saam tv news

Shrivalli Bhamidipaty :

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए)आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने पात्रता फेरीतील सामन्यात सुरेख खेळाचे प्रदर्शन करत या स्पर्धेतील मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे.

हैदराबाद २२ वर्षीय श्रीवल्लीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

सध्याची एकेरी व दुहेरी राष्ट्रीय विजेती श्रीवल्लीला माजी जागतिक अग्रमानांकित खेळाडू मारिया शारापोवा हीच्या मैदानावरील आकर्षक पोशाखांनी प्रभावित केले आहे. यावेळी श्रीवल्ली म्हणाली की,मी आधीपासून मारिया शारापोवाचे फोटो पाहते. तिच्यासारखे सुंदर कपडे घालण्याच्या मोहापोटीच मी वयाच्या केवळ ११ व्या वर्षी टेनिसकडे वळाले. टेनिस खेळत असल्यामुळेच मला तिच्यासारखे आकर्षक कपडे घालता आले. त्या अर्थाने माझा टेनिस मधील सहभाग हा एक योगायोग होता. (Cricket news in marathi)

 Shrivalli Bhamidipaty
IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

आई बास्केटबॉल खेळाडू आणि वडील क्रिकेट व कराटे पटू असल्यामुळे क्रीडा क्षेत्राची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीवल्लीने टेनिसला प्रारंभ केल्यानंतर खेळाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. माझ्यासाठी हा सारा प्रवास खाचखळग्यांचा होता असे सांगून श्रीवली म्हणाली की, टेनिस मला खरोखरीच खूप आवडते याचे दुसरे कारण म्हणजे घरात बसून सारखे अभ्यास करण्याची सक्ती केली जात नाही.

 Shrivalli Bhamidipaty
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

डब्लुटीए मुंबई ओपन या स्पर्धेतील माझे हे पदार्पणच असल्यामुळे मी त्यासाठी कोणतेही लक्ष ठेवलेली नाही, असे सांगून श्रीवल्ली म्हणाली, मी खेळाचा पुर्ण आनंद घेऊ इच्छिते आणि माझी प्रत्येक प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा सरस मानांकित असणार आहे. त्यामुळे माझी सर्वोत्तम कामगिरी करणे इतकेच माझे ध्येय असणार आहे.'मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीतील सामन्यात श्रीवल्ली समोर दुसऱ्या मानांकित नाओ हिबिनोचे आव्हान असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com