WTA mumbai open
WTA mumbai opensaam tv news

WTA Mumbai Open: सहा वर्षांनंतर रंगणार 'मुंबई ओपन' स्पर्धेचा थरार! ३१ देशातील दिग्गज खेळाडू घेणार सहभाग

Mumbai Opens Return In India: सहा वर्षाच्या कालावधीनंतर एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १,२५००० डॉलर टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये ३१ देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.

WTA Mumbai Open Latest News:

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय)यांच्या वतीने सहा वर्षाच्या कालावधीनंतर एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १,२५००० डॉलर टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये ३१ देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.

या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात जागतिक क्रमवारीतील पहिल्या १०० मधील तीन खेळाडू, दुहेरीमधील सहा खेळाडू खेळणार आहेत. ही स्पर्धा डब्लूटीएच्या १ लाख २५ हजार डॉलर पारितोषिक रक्कम असलेल्या जागतिक मालिकेतील एक स्पर्धा आहे.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टेनिस कोर्टवर हि स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने शनिवार ३, फेब्रुवारी व रविवार ४ फेब्रुवारी रोजी खेळविण्यात येणार आहेत. तर मुख्य ड्रॉच्या फेरीस सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४ पासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना रविवार, ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

२०१६मधील यूएस ओपन स्पर्धेतील विजेती व जागतिक क्रमवारीत ९२व्या स्थानी असलेली अमेरिकेची कायला डेसह डब्लूटीए स्पर्धेत तीनवेळा विजेतेपद पटकावणारी जपानची नाओ हिबिनो, फ्रेंच ओपन उपांत्य फेरीत प्रवेश करणारी माजी खेळाडू व जागतिक क्रमवारीत ९७ व्या क्रमांकावर असणारी खेळाडू तमारा झिदानसेक हे अव्वल टेनिसपटू स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

याशिवाय अमेरिकेची कॅटी वॉलनेट्स, आस्ट्रेलियाची अरिना रोडिनोव्हा, किंबर्ली बायरेईल, ब्राझीलची लौरा पिगोसी यांसह गतवर्षी कुमार गटात अव्वल खेळाडूंमध्ये समावेश असलेली व २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारलेली रशियाची १६ वर्षीय अॅलिना कोर्निवा देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

WTA mumbai open
IND vs ENG 2nd Test: जडेजा अन् राहुलच्या जागी कोणाला संधी मिळणार? हे आहेत पर्याय

भारताची दुहेरीतील अव्वल खेळाडू प्रार्थना ठोंबरे आणि डच खेळाडू अरीनी हार्तोनो या जोडीला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात आला आहे. तर स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या खेळाडूंची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य संजय खांडरे(आयएएस) आणि प्रवीण दराडे(आयएएस) यांनी सांगितले की, मुंबईतील टेनिस प्रेमींसाठी हा आठवडा रोमांचकारी अनुभव देणारा ठरणार आहे.

काही वर्षांनी पुन्हा एकदा सर्वोत्तम दर्जाचे टेनिस मुंबईत आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. डब्लूटीए महिला ओपन टेनिस स्पर्धेने यापूर्वी काही अनेक टेनिसपटू दिले आहेत. यामध्ये दोन वेळा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकलेली आर्यना सबालेन्काचा समावेश आहे. सबालेन्काने २०१७ मध्ये सर्वप्रथम येथेच डब्लूटीए स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. (Sports News In Marathi)

WTA mumbai open
IND vs ENG: दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव निश्चित? इंग्लंडच्या हेड कोचने सांगितला प्लान

यावर्षी देखिल या स्पर्धेत काही तगड्या खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये कायला डे, नाओ हिबिनो आणि तामरा झिदानसेक यांच्याबरोबरीने रशियाची उदयोन्मुख अॅलिना कोर्निवा हिचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकर टेनिसप्रेमी स्पर्धा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोर्टवर येतील असा विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले .

डब्लूटीए मुंबई ओपन स्पर्धेची हि तिसरी आवृत्ती असून याआधीच्या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली सबलेंका(२०१७) आणि थायलंडची लुकसिका कुमखुम(२०१८) यांनी एकेरीचे विजेतेपद पटकावले होते.

तसेच, या स्पर्धेला एल अँड टी इंडिया यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून एमएमआरडीए(मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटी), डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स, सिस्को, म्हाडा(महाराष्ट्र हौसिंग अँड एरिआ डेव्हलपमेंट ऑथोरिटी), एनरझल, रेडिओ सिटी, अमरेटी वॉटर, सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल यांचा पाठिंबा लाभला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com