Shikhar Dhawan: शिखर धवन ED च्या रडारवर; ऑनलाईन बेटींग प्रकरणात अडकला माजी क्रिकेटर

ED Summons Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीचा फलंदाज शिखर धवन एका मोठ्या वादात अडकला आहे. एका ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात त्याचे नाव समोर आल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्याची चौकशी सुरू केली आहे.
Shikhar Dhawan
Shikhar Dhawansaam tv
Published On

भारतीय क्रिकेट संघाचा माजी ओपनर शिखर धवन याला ED ने ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवलंय. धवनला आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात ईडी याआधीच टीम इंडियाचे माजी खेळाडू सुरेश रैना याची चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांच्याही जबाबाची नोंद घेण्यात आली आहे.

Shikhar Dhawan
Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा T20 चा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू, टिळक वर्माची फलंदाजीत गरूड झेप

जाहिरातीतील भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलंय

ईडीने शिखर धवनला पाठवलेल्या नोटिसमध्ये त्याने अवैध बेटिंग अॅप 1xBet च्या जाहिरातींमध्ये केलेल्या सहभागाबाबत स्पष्टीकरण द्यावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ईडी ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मविरोधात कारवाई करत असून आता तपासाला अधिक वेग दिला आहे. या चौकशीत केवळ क्रिकेटपटूच नाही तर या प्लॅटफॉर्मच्या जाहिरातींमध्ये दिसलेले बॉलिवूड कलाकारही ईडीच्या रडारवर आहेत.

Shikhar Dhawan
Hardik Pandya : ICC रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा; हार्दिक पंड्याची मोठी झेप, थेट क्रमांक १ जवळ पोहोचला

रैना आणि हरभजनची याआधीच चौकशी

जून महिन्यात ईडीने या प्रकरणात काही बड्या खेळाडूंचीही चौकशी केली होती. यामध्ये सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांचा समावेश होता. त्यांचे निवेदन केंद्रीय यंत्रणेकडे नोंदवलं गेलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच ऑनलाइन रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी नवीन कायदा लागू केला आहे.

Shikhar Dhawan
ICC Rankings : मोहम्मद नबी ठरला नंबर १ ऑल राउंडर, टॉप १० मध्ये फक्त एका भारतीयाचा सामावेश

शिखर धवनचे क्रिकेट करिअर

शिखर धवनने भारताकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आयपीएल २०२४ सिझननंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. डावखुरा ओपनर म्हणून धवनची गणना भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते.

Shikhar Dhawan
ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; सिकंदर ऑलराउंडर नंबर १, हार्दिक पंड्याचं स्थान धोक्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com