Sarfaraz Khan : टीम इंडियात चान्स हुकला, पण खचला नाही! सरफराजनं ठोकलं द्विशतक, 52 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

Sarfaraz Khan double century : इराणी चषकात रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध खेळताना सरफराज खान यानं द्विशतक झळकावून ५२ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला.
sarfaraz khan hits double century : सरफराज खान यानं इराणी चषकात द्विशतक झळकावून ५२ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत काढला.
sarfaraz khan hits double century : सरफराज खान यानं इराणी चषकात द्विशतक झळकावून ५२ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत काढला. @BCCIdomestic / X
Published On

भारत विरुद्ध बांगलादेश (Ind vs Ban) कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळूनही मैदानात न उतरता बाकड्यावर बसायला लागलेल्या सरफराज खान (Sarfaraz Khan) यानं धडाकेबाज कामगिरी केली आहे. टीम इंडियात संधी मिळाली नाही म्हणून सरफराज खचला नाही. इराणी चषक स्पर्धेत त्याला संधी मिळाली आणि त्यानं तिचं सोनं केलं. मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया (mumbai vs rest of india) या दोन संघांत झालेल्या सामन्यात त्यानं चक्रावून टाकणारी फलंदाजी केली. त्यानं धडाकेबाज द्विशतक झळकावलं. अशी कामगिरी करणारा तो पहिला मुंबईकर ठरला. त्याचबरोबर ५२ वर्षांचा विक्रमही मोडीत काढला.

भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात नुकतीच कसोटी मालिका झाली. रोहितच्या नेतृत्वात संघानं बांगलादेशला नुसतं पराभूत केलं नाही, तर अक्षरशः लोळवलं. या मालिकेसाठी खरं तर सरफराज खानला टीम इंडियात स्थान देण्यात आलं होतं. पण प्लेइंग ११ मध्ये जागा मिळू शकली नाही. अखेर त्याला इराणी चषक (irani cup 2024) स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि ती त्यानं दवडली नाही. मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडियामध्ये झालेल्या लढतीत सरफराजनं २२१ धावांची स्फोटक खेळी केली. इराणी चषकात अशी कामगिरी करणारा तो पहिला मुंबईकर (Mumbai) ठरला. तर सर्वाधिक धावा करणाऱ्या मुंबईकर खेळाडूचा ५२ वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला.

sarfaraz khan hits double century : सरफराज खान यानं इराणी चषकात द्विशतक झळकावून ५२ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत काढला.
Men's Test Bowling Rankings : बुमराह एक नंबर! टेस्ट रँकिंगमध्ये भारताचे आणखी २ धुरंधर

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी लढतीत सरफराजला टीम इंडियात स्थान दिलं होतं. कानपूर कसोटीत प्लेइंग ११ मध्ये सरफराज खानला जागा मिळू शकली नाही. त्यानंतर लगेच त्याला इराणी चषकात खेळण्याची सूट देण्यात आली. सध्या मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात सामना सुरू आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ५३६ धावांचा डोंगर उभारला.

मुंबईने पहिल्याच दिवशी ४ बाद २३७ धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे याने ८६ आणि सरफराज खानने ५४ धावांवरून डाव पुढे नेला. रहाणे काही वेळातच बाद झाला. अवघ्या तीन धावांनी त्याचं शतक हुकलं. पण सरफराज टिच्चून फलंदाजी करू लागला. त्याने शतकच नव्हे, तर द्विशतक झळकावलं.

sarfaraz khan hits double century : सरफराज खान यानं इराणी चषकात द्विशतक झळकावून ५२ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत काढला.
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; न्यूझीलंड सिरीजपूर्वी 'हा' खेळाडू झाला गंभीर जखमी!

या कामगिरीसह सरफराज मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रामनाथ पार्कर यांचा विक्रमही मोडला. पार्कर यांनी १९७२ मध्ये रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध १९५ धावांची खेळी केली होती. सरफराजने २७६ चेंडूंचा सामना करताना २२१ धावा कुटल्या. त्यात २५ चौकार आणि चार षटकार तडकावले. तो नाबाद राहिला आहे. मुंबई तिसऱ्या दिवशीही मैदानात फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, मुंबईचा कर्णधार डाव घोषित करू शकतो आणि रेस्ट ऑफ इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com