Samit Dravid: टीम इंडियात स्थान तर मिळालं, पण द्रविडच्या लेकाला U-19 WC खेळता येणार नाही; वाचा कारण

Rahul Dravid Son, U-19 WC: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि फलंदाज राहुल द्रविड यांच्या मुलाची भारतीय अंडर १९ संघात निवड झाली आहे.
Samit Dravid: टीम इंडियात स्थान तर मिळालं, पण द्रविडच्या लेकाला U-19 WC खेळता येणार नाही; वाचा कारण
SAMIT DRAVIDTWITTER
Published On

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांच्या मुलाची सध्या जोरदार चर्चा होतेय. राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याची भारताच्या अंडर १९ संघात निवड झाली आहे.

भारतीय अंडर १९ आणि ऑस्ट्रेलिया अंडर १९ यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर अनेकांना वाटतंय की, त्याने अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करावं. मात्र त्याला भारतीय संघासाठी खेळता येणार नाही. काय आहे कारण? जाणून घ्या.

Samit Dravid: टीम इंडियात स्थान तर मिळालं, पण द्रविडच्या लेकाला U-19 WC खेळता येणार नाही; वाचा कारण
Samit Dravid: ज्युनिअर द्रविडची टीम इंडियात निवड! या मालिकेतून करणार पदार्पण

राहुल द्रविड यष्टिरक्षक फलंदाज होते. तर त्यांचा मुलगा समित (Samit dravid) हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी देखील करतो. आगामी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धा २०२६ मध्ये होणार आहे. या नोव्हेंबर महिन्यात समित आपला १९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे तो आगामी अंडर १९ वर्ल्डकप खेळू शकणार नाही. समित सध्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराजा टी -२० लीग स्पर्धा खेळतोय.

Samit Dravid: टीम इंडियात स्थान तर मिळालं, पण द्रविडच्या लेकाला U-19 WC खेळता येणार नाही; वाचा कारण
Team India News: टीम इंडियात संधी मिळेना! शिखर धवननंतर हे ३ भारतीय खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

केव्हा होणार मालिकेला सुरुवात?

पहिला वनडे सामना- २१ सप्टेंबर - सकाळी ९:३० वाजता, पुदुचेरी

दुसरा वनडे सामना - २३ सप्टेंबर - सकाळी ९:३० वाजता, पुदुचेरी

तिसरा वनडे सामना - २६ सप्टेंबर - सकाळी ९:३० वाजता, पुदुचेरी

पहिला ४ दिवसीय सामना - ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर- सकाळी ९: ३० वाजता, चेन्नई

दुसरा ४ दिवसीय सामना - ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर, सकाळी ९:३० वाजता, चेन्नई

महाराजा प्रीमियर लीग स्पर्धेत कशी कामगिरी केली?

समितला महाराजा प्रीमियर लीग स्पर्धेत आतापर्यंत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तो या स्पर्धेत ७ वेळेस फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. यादरम्यान त्याला ८२ धावा करता आल्या आहेत.

यादरम्यान ३३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. या स्पर्धेत त्याला आपली छाप सोडता आलेली नसली तरीदेखील यापूर्वी झालेल्या कूच बिहार ट्रॉफी स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली होती. कर्नाटक संघाला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com