Samit Dravid: ज्युनिअर द्रविडची टीम इंडियात निवड! या मालिकेतून करणार पदार्पण

Rahul Dravid Son Selected In Team India: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या लेकाची भारतीय संघात निवड झाली आहे.
Samit Dravid: ज्युनिअर द्रविडची टीम इंडियात निवड! या मालिकेतून करणार पदार्पण
samit dravidtwitter
Published On

भारताचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुलगा समित द्रविडची (Samit Dravid) भारतीय संघात एन्ट्री झाली आहे. महाराजा ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय अंडर १९ संघात स्थान देण्यात आलं आहे. बीसीसीआयने नुकताच मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय अंडर १९ संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात समित द्रविडचाही समावेश करण्यात आला आहे. (Samit Dravid Selected In Team India)

भारतीय अंडर १९ आणि ऑस्ट्रेलिया अंडर १९ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि २ चार दिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हे सामने पुदुचेरी आणि चेन्नईमध्ये खेळले जाणार आहेत.

भारतीय U19 संघ (ऑस्ट्रेलिया U19 विरुद्ध एकदिवसीय मालिका):

रुद्र पटेल (उपकर्णधार) (GCA)

साहिल पारख (MAHCA)

कार्तिकेय के.पी. (KSCA)

मोहम्मद अमान (कर्णधार) (UPCA)

किरण चोरमले (MAHCA)

अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक) (MCA)

हरवंश सिंग पंगालिया (यष्टीरक्षक) (SCA)

समित द्रविड (KSCA)

युधाजीत गुहा (CAB)

समर्थ एन (KSCA)

निखिल कुमार (UTCA)

चेतन शर्मा (RCA)

हार्दिक राज (KSCA)

रोहित राजावत (MPCA)

मोहम्मद एना (KCA)

Samit Dravid: ज्युनिअर द्रविडची टीम इंडियात निवड! या मालिकेतून करणार पदार्पण
Samit Dravid Video: द्रविडच्या मुलाची वेगवान गोलंदाजी! मुंबईविरुद्ध 2 विकेट्सही घेतल्या, रन किती दिले?

भारत U19 संघ (ऑस्ट्रेलिया U19 विरुद्ध चार-दिवसीय मालिका):

वैभव सूर्यवंशी (बिहार CA)

नित्य पंड्या (BCA)

विहान मल्होत्रा (उपकर्णधार) (PCA)

सोहम पटवर्धन (कर्णधार) (MPCA)

कार्तिकेय के.पी. (KSCA)

समित द्रविड (KSCA)

अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक) (MCA)

हरवंश सिंग पंगालिया (यष्टीरक्षक) (SCA)

चेतन शर्मा (RCA)

समर्थ एन (KSCA)

आदित्य रावत (CAU)

निखिल कुमार (UTCA)

अनमोलजीत सिंग (PCA)

आदित्य सिंग (UPCA)

मोहम्मद एना (KCA)

Samit Dravid: ज्युनिअर द्रविडची टीम इंडियात निवड! या मालिकेतून करणार पदार्पण
सेम टू सेम द्रविड स्टाइल, पोरानं कमाल केली, सिक्सर असा खेचला की सर्व बघतच बसले, VIDEO

असं आहे वेळापत्रक

पहिला वनडे सामना- २१ सप्टेंबर - सकाळी ९:३० वाजता, पुदुचेरी

दुसरा वनडे सामना - २३ सप्टेंबर - सकाळी ९:३० वाजता, पुदुचेरी

तिसरा वनडे सामना - २६ सप्टेंबर - सकाळी ९:३० वाजता, पुदुचेरी

पहिला ४ दिवसीय सामना - ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर- सकाळी ९: ३० वाजता, चेन्नई

दुसरा ४ दिवसीय सामना - ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर, सकाळी ९:३० वाजता, चेन्नई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com