बप्पी दा यांच्या निधनाची बातमी ऐकून सचिन तेंडुलकर व्याकुळ

बप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarSaam tv
Published On: 

मुंबई - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले. त्यांनी आज मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हे देखील पहा -

भारतीय संगीत उद्योगातील सर्वात लोकप्रिय गायक आणि संगीतकारांच्या यादीत बप्पी दा यांचे नाव समाविष्ट आहे. बप्पी लाहिरी यांच्या निधनाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खूप दुःख झाले आहे. सचिनने ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, मला बप्पी दाचे संगीत खूप आवडायचे, विशेषत: “याद आ रहा है” - हे संगीत मी ड्रेसिंग रूममध्ये अनेकदा ऐकले. त्याच्या प्रतिभेची श्रेणी खरोखरच आश्चर्यकारक होती. बप्पी दा तुम्ही आमची आठवणीत नेहमी राहणार.

2020 मध्ये बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि त्यांची मुलगी असा परिवार आहे. भारतीय संगीत उद्योगातील एक आयकॉन. बप्पी दा तुमची आठवण येईल असे ट्विट करत विराट कोल्हीने शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com