Ross Taylor On Team India Playing 11: 'त्याच्या निर्णयाचा आदर करा..' रोहितच्या निर्णयाचं दिग्गजाने केलं समर्थन

Team India Playing 11: लंडनच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv
Published On: 

IND VS AUS WTC Final 2023: लंडनच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. भारत या ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यात रोमांचक लढत पाहायला मिळत आहे.

सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांची जोडी तोडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. दरम्यान प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळालेल्या आर अश्विन बद्दल रॉस टेलरने मोठे वक्तव्य केले आहे.

rohit sharma
WTC Final IND vs AUS : टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सलग दुसऱ्यांदा इंग्लंडमध्ये का? चकीत करणारी माहिती आली समोर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यासाठी रोहित शर्माने प्लेइंग ११ मध्ये ४ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. तर फिरकी केवळ एक फिरकीपटू म्हणून जडेजाला या संघात स्थान दिलं गेलं आहे. आर अश्विनला संघाबाहेर ठेवल्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळपट्टी तिसऱ्या दिवसानंतर फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा स्थितीत भारतीय संघात एकही ऑफ स्पिन टाकणारा गोलंदाज उपलब्ध नाही. (Latest sports updates)

rohit sharma
WTC 2023 : या 6 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाडलाय धावांचा पाऊस

याबाबत बोलताना रॉस टेलर म्हणाला की, 'तुम्ही जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियाने या संघात ४ फलंदाजांना स्थान दिलं आहे. आर अश्विन हा डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना घातक ठरू शकतो. खेळपट्टीवरील हिरवळ पाहून रोहितने संघात ४ वेगवान गोलंदाजांना स्थान दिले असावे. त्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.'

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव,शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी,

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.