Rohit vs Hardik: हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवर रोहित शर्मा संतापला; भर मैदानातच सुनावलं, पाहा VIDEO

GT vs MI IPL 2024 Mach Video: हार्दिक पांड्याने केलेल्या चुकीमुळेच मुंबईने हा सामना गमावला अशी टीका मुंबई इंडियन्सचे चाहते सोशल मीडियावर करीत आहेत.
Rohit Sharma vs Hardik Pandya
Rohit Sharma vs Hardik PandyaSaam TV

Rohit Sharma vs Hardik Pandya Viral Video

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने ६ धावांनी विजय मिळवला. एकवेळ मुंबई इंडियन्स संघ हा सामना सहज जिंकेल असं अनेकांना वाटत होतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Sharma vs Hardik Pandya
MI vs GT Match: हार्दिकला 'ती' चूक नडली, गुजरातने तिथेच फिरवला सामना; मुंबईच्या पराभवाचा काय ठरला टर्निंग पॉइंट?

पण अखेरच्या काही षटकात गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत मुंबईच्या तोंडचा घास पळवला. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) केलेल्या चुकीमुळेच मुंबईने हा सामना गमावला अशी टीका मुंबई इंडियन्सचे चाहते सोशल मीडियावर करीत आहेत. रोहित कर्णधार असता, तर मुंबईने हा सामना गमावला नसता, असं अनेकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, या सामन्यानंतर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रोहित हार्दिकवर संतापल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला चांगलंच ट्रोल केलंय. (Breaking Marathi News)

व्हायरल झालेल्या व्हिडीओत रोहित शर्मा हा सामना संपल्यानंतर अनंत अंबानी आणि गुजरात टायटन्सचा गोलंदाज राशिद खानसोबत गप्पा मारताना दिसून येत आहे. तिघांचेही चर्चासत्र सुरू असताना त्याचवेळी पाठीमागून हार्दिक पांड्या येतो आणि रोहित शर्माला मिठी मारतो.

मात्र, यानंतर रोहित शर्मा हार्दिक पांड्यावर चांगलाच संतापतो. कर्णधार म्हणून तू कोणत्या चुका केल्यात, याबाबत रोहित हार्दिकची कानउघडणी करताना दिसून येत आहे. दोघांमध्ये झालेली चर्चा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्याला चांगलंच ट्रोल करीत आहेत.

Rohit Sharma vs Hardik Pandya
IPL 2024 : रोहितला हार्दिकचा'हुकूम'; क्षेत्ररक्षणासाठी हिटमॅनची पळवापळव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com