Rohit Sharma On Virat Kohli: 'संघात त्याच्यासारखा खेळाडू हवाच',रोहितकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव..

IND vs WI: मालिका संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचे गुणगान गायल्याचे पाहायला मिळाले आहे.
virat kohli
virat kohlisaam tv
Published On: 

Rohit Sharma Praised Virat Kohli: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पाचवा दिवस पावसाने धुतला गेला. त्यामुळे हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला.

यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान मालिका संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचे गुणगान गायल्याचे पाहायला मिळाले आहे.

virat kohli
IND vs WI: विराटच्या जागी ईशान फलंदाजीला का आला? रोहितने सांगितलं थक्क करणारं कारण

त्रिनिदाद कसोटीतील पहिल्या डावात विराटने दमदार शतकी खेळी केली. त्याने ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४३८ धावांपर्यंत मजल मारता आली. विराट कोहलीबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' कठीण परिस्थितीत संघाचा डाव सावरण्यासाठी विराट कोहलीसारख्या खेळाडूंची गरज असते. संघातील ४ फलंदाज माघारी परतल्यानंतर त्याने जबाबदारी घेऊन फलंदाजी केली.'

रोहित शर्माची शतकी खेळी...

या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा देखील दमदार फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक ठरले. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने मिळून दोन्ही सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. (Latest sports updates)

virat kohli
IND vs WI ODI Series: वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा! निवडकर्त्यांनी 'या' 15 खेळाडूंना दिलं स्थान

जयस्वालचा पदार्पणातच धमाका..

या मालिकेत यशस्वी जयस्वालला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने १६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १७१ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील त्याने जोरदार अर्धशतकी खेळी केली. त्याने ७४ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. या मालिकेत त्याने सर्वाधिक २६६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.