Best Fielder Medal: रोहित की जडेजा? बेस्ट फिल्डर मेडल कोणाला मिळालं? पाहा VIDEO

India vs New Zealand, Best Fielder Medal: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या फायनलच्या सामन्यानंतर बेस्ट फिल्डर अवॉर्ड कोणाला मिळाला? जाणून घ्या.
Best Fielder Medal: रोहित की जडेजा? बेस्ट फिल्डर मेडल कोणाला मिळालं? पाहा VIDEO
rohit sharmatwitter
Published On

भारतीय खेळाडूंनी १२ वर्षांची प्रतीक्षा संपवत अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला आणि न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली.

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंसह कोट्यवधी भारतीयांनी जल्लोष साजरा केला. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या विजयामुळे भारतीय फॅन्सला २०२३ वर्ल्डकप पराभवाचं दुःख विसरण्याची संधी मिळाली.

Best Fielder Medal: रोहित की जडेजा? बेस्ट फिल्डर मेडल कोणाला मिळालं? पाहा VIDEO
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपासून भारतीय संघात एक नवीन परंपरा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला बेस्ट फिल्डरचं मेडल दिलं जातं. ही परंपरा फायनलचा सामना झाल्यानंतरही कायम ठेवण्यात आली. हे मेडल सामना झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये दिलं जातं. प्रत्येक वेळी हे मेडल वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं.

Best Fielder Medal: रोहित की जडेजा? बेस्ट फिल्डर मेडल कोणाला मिळालं? पाहा VIDEO
Ind vs Nz Live : धोनीचा बदला विराटने घेतला, सँटनर आऊट होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलचा सामना झाल्यानंतर, मेडल देण्याचा कार्यक्रम पार पडला. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप भारतीय संघाचं कौतुक करताना दिसून आले. कौतुक केल्यानंतर त्यांनी रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांना पुरस्कार जिंकण्यासाठी उमेदवार जाहीर केलं.

तुम्ही यापूर्वीही अनेकदा हा पुरस्कार सोहळा पाहिला असेल. कधी मोठ्या पडद्यावर तर कधी एखादा दिग्गज खेळाडू येऊन हा पुरस्कार देऊन जातो. मात्र यावेळी टी दिलीप यांनी विजेत्याचं नाव जाहीर करण्यासाठी फार वेळ घेतला नाही. त्यांनी मेडल जडेजाच्या गळ्यात घातलं. जडेजाने या सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. या क्षेत्ररक्षणाच्या बळावर त्याने हे मेडल पटकावलं. यासह शेवटी चौकार मारून जडेजाने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com