Sports News : टीम इंडियाने सलग दोन सामने मोठ्या फरकाने जिंकत बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेची धमाकेदार सुरूवात केली. त्यामुळे भारतात विजयाच्या इराद्याने आलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर मोठं दडपण आलं. मात्र, दोन्ही सामने भारताने जिंकले असले तरी भारतीय निवड समिती अजूनही चिंतेत आहे. कारण, दोन्ही सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. (Latest Sports Updates)
टॉप ऑर्डरमधील रोहित शर्मा (Rohit Sharma) वगळता. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि श्रीकर भरत यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. केएल राहुलला इतक्या मोठ्या प्रमाणात संधी मिळूनही तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे निवड समितीवर टीका झाली. परिणामी उर्वरीत दोन कसोटी सामन्यात त्याला संधी मिळण्याची फारच कमी शक्यता आहे.
कारण, निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) उर्वरीत दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये केएल राहुलच्या नावाचा समावेश आहे. मात्र, त्याच्याकडून उपकर्णधार पदाची सूत्रे काढून घेण्यात आली आहे. अशातच, तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला संधी मिळाली नाही, तर टीम इंडियाचा उपकर्णधार कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
रोहित शर्माच्या मित्राला मिळणार संधी?
टीम इंडियाचे (Team India) उपकर्णधारपद राहुलकडे नसले तर ते कोणाकडे जाणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण आता रोहित शर्माचा खास मित्र उपकर्णधार होणार असल्याचे समोर येत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आहे. रोहित आणि चेतेश्वर पुजाराचे संबंध हे रणजी करंडक क्रिकेटपासूनचे आहेत. (Latest Marathi News)
पुजाराकडे कसोटी सामन्यांचा तगडा अनुभव
कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम फलंदाज अशी ख्याती पुजाराची आहे. पुजारा हा चांगल्या फॉर्मात आहे. त्याने बांगलादेशमध्ये जलद शतक झळकावले होते. त्याचबरोबर तिहेरी शतकही त्याच्या नावावर आहे. पुजाराकडे कसोटी सामन्यांचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघ जेव्हा वनडे किंवा टी-२० क्रिकेटमध्ये व्यग्र असेल तेव्हा तो कसोटीबाबतची आपली रणनिती आखू शकतो आणि त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.