Selfie Controversy : टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉबरोबर केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणी पोलिसांनी सोशल मीडिया स्टार सपना गिलसह तिच्या तीन साथीदारांना अटक केली होती. सोमवारी त्यांना कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, जामीनावर बाहेर येताच, सपना गिलने पृथ्वी शॉवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)
पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी मला आणि माझ्या मित्रांना मारहाण केली. तसेच त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला देखील स्पर्श केला, असा खळबळजनक आरोप सपना गिलने केला आहे. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रारही दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात पृथ्वी शॉसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Latest Sports Updates)
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ (Team India) आणि त्याचे मित्र मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान क्रिकेटरचा एक चाहता आणि एक महिला त्याच्या टेबलाजवळ आली. महिला चाहत्याने क्रिकेटरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. काही फोटो आणि व्हिडीओ काढूनही ती थांबली नाही, तेव्हा पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करून चाहत्यांना हटवण्यास सांगितले.
रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून बाहेर काढले. यावरून त्यांना राग अनावर झाला. संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर पृथ्वी शॉची वाट पाहत राहिले. दरम्यान, बाहेर आल्यानंतर त्यांनी पृथ्वी शॉसोबत वाद घातला. आरोपींनी पृथ्वी शॉच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला.
इतकंच नाही तर, आरोपींनी एका सिग्नलवर गाडी थांबवून त्याच्या कारची काच देखील फोडली. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी पृथ्वीच्या मित्राकडे 50 हजार रुपयांची मागणी देखील केली. कारची काच फुटल्याने प्रकरण आणखी चिघळले. क्रिकेटपटू आणि चाहते यांच्यात वादावादी झाली. यातून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सपना गिल हिने केला आहे.
सपना गिलले काय म्हटलं?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलनं म्हटलं, "मी कोणालाही मारहाण केलेली नाही तसेच आम्ही पैसेही मागितलेले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. मी सेल्फीसाठीही कधी विचारलेलं नाही. आम्ही आमचं एन्जॉय करत होतो. यावेळी आमचे अनेक मित्र व्हिडिओ काढत होते. पृश्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी आमच्याकडे येऊन माझ्यासमोर माझ्या मित्रांना मारहाण केली.
माझ्या मित्राला मी वाचवायला धावले तर त्यांनी मला बेसबॉलनं मारलं. तसेच एक ते दोन लोकांनी मला मारहाण केली आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला त्यांनी स्पर्श केला. तसेच माझ्या कानाखाली देखील मारली. या घटनेनंतर आम्ही त्यांना एअरपोर्टवर थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी गर्दी गोळा केली आणि पळून गेले. ते खूपच आक्रमक होते आणि दारु प्यायलेले होते, असा आरोप सपना गिल हिने केला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.