IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Rohit Sharma Virat Kohli ODI comeback: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिली लढत पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Rohit Sharma Virat Kohli ODI comeback
Rohit Sharma Virat Kohli ODI comebacksaam tv
Published On

अखेर ज्या सामन्याची सर्वांना उत्सुकता होती, त्या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पर्थमध्ये खेळवला जातोय. यावेळी सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे असणार आहे. टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर हे दोन्ही खेळाजू केवळ वनडे सामन्यांमध्ये खेळणार आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहित शर्माच्या फलंदाजीचा आनंद सामन्याच्या सुरुवातीलाच घेता येणार आहे.

Rohit Sharma Virat Kohli ODI comeback
Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

या तीन खेळाडूंचा झाला डेब्यू

या सामन्यात भारताकडून ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीला संधी देण्यात आली असून हा त्याचा वनडे इंटर नॅशनलमधील पहिला सामना होता. नितीशला त्याची ओडीआय कॅप रोहित शर्माने दिली. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन टीमसाठी मिचेल ओवेन आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी आपला वनडे फॉर्मेटमध्ये डेब्यू केला आहे.

भारताची प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.

Rohit Sharma Virat Kohli ODI comeback
IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन

ट्रेविस हेड, मिच मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कोनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नाथन एलिस, मॅथ्यू कुहनेमॅन आणि जोश हेझलवुड.

Rohit Sharma Virat Kohli ODI comeback
टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com