
Rishabh Pant News In Marathi: काही दिवसांपूर्वीच आयपीएलचा लिलाव पार पडला. या लिलावात रिषभ पंतचं नाव येताच फ्रेंचायझींमध्ये त्याच्यावर बोली लावण्याची शर्यत लागली. बोली २७ कोटींवर जाऊन पोहोचली आणि रिषभ पंत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
आता २७ कोटी बोली तर लागली, पण रिषभला खरंच २७ कोटी मिळणार का? तर उत्तर आहे, नाही. रिषभला किती पैसे मिळणार? कसं असेल गणित? जाणून घ्या.
रिषभ पंतवर आयपीएलच्या लिलावात २७ कोटींची बोली लागली आहे. लखनऊ सुपर जांयट्सने त्याच्यावर ही विक्रमी बोली लावली. मात्र आश्चर्यचकीत करणारी बाब अशी, की त्याला फक्त १८.९ कोटी रुपये मिळणार आहेत.
तर ८.१ कोटी रुपये कापले जाणार आहेत. त्याला या मोठ्या रकमेतून टॅक्स द्यावा लागणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्याला मिळणाऱ्या एकूण रकमेतून ३० टक्के रक्कम टॅक्स म्हणून वजा केली जाईल. ही केवळ रिषभ पंत नव्हे, तर प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधनातून वजा केली जाणार आहे.
रिषभ पंतने दिल्लीकडून खेळताना आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. सुरुवातीपासून तो याच संघाकडून खेळतोय. मात्र त्याने या हंगामात दिल्ली कॅपिटल्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो यावेळी लिलावात आला.
लिलावात त्याची बेस प्राईज २ कोटी रुपये इतकी होती. सर्वच संघांनी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला. शेवटी लखनऊने २७ कोटींची डिल करत त्याला आपल्या संघात घेतलं.
आगामी हंगामासाठी त्याची लखनऊच्या कर्णधारपदी निवड केली जाऊ शकते. गेल्या ३ पैकी २ वेळेस या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी संघाचं नेतृत्व करताना त्याच्यावर संघाला प्लेऑफमध्ये पोहचवून फायनल जिंकून देण्याचा दबाव असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.