

RCB Vs LSG IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
या मैदानावर धावांचा पाऊस पडत असतो. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात देखील धावांचा पाऊस पडणार यात काहीच शंका नाही.
एम चिन्नास्वामी स्टेडियमची बाउंड्री इतर मैदानांच्या तुलनेत छोटी आहे. तसेच ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या १८३ आहे. यादरम्यान प्रत्येक सामन्यात १८ षटकार मारले गेले आहेत. हे मैदान सिक्सर फ्रेंडली आहे.
वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांनी या खेळपट्टीवर कमी धावा खर्च केल्या आहेत. वेगवान गोलंदाजांनी या खेळपट्टीवर ९.८ च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. तर फिरकी गोलंदाजांनी केवळ ८.१ च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आहेत.
आजही पडणार धावांचा पाऊस..
आज देखील क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे फलंदाज आहेत.
तर लखनऊ सुपर जायंट्स संघात केएल राहुल, क्विंटन डी कॉक आणि काईल मेयर्स सारखे आक्रमक फलंदाज आहेत. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू शकतो, कारण या मैदानावर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. (Latest sports updates)
हेड टू हेड रेकॉर्ड..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मजबूत स्थितीत आहे. कारण २ वेळेस हे संघ आमने सामने आले आहेत. यापैकी दोन्ही सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, एमके लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा.
लखनऊ सुपर जायंट्स:
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस/क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम/अमित मिश्रा, यश ठाकूर, आवेश खान/जयदेव उनाडकट, मार्क वुड, रवी बिश्नोई.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.