RCB vs GT Pitch Report: आधी फलंदाजी करणाऱ्या संघाचे वाजतील बारा; चिन्नास्वामी स्टेडियम कोणत्या संघाला देणार साथ?

RCB vs GT Pitch Report: आज IPL 2025 चा 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल ते जाणून घेऊ.
RCB vs GT Pitch Report
RCB vs GT Pitch ReportSaam Tv
Published On

इंडियन प्रीमियर लीगमधील आजचा सामना सर्वात जास्त रोमांचकारी असणार आहे. दोन्ही ताकदवान संघ आमनेसामने आलेत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात टायटन्समध्ये लढत होणार आहे. या मैदानात हे दोन्ही संघ दोनदा भिडले आहेत. दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकलाय. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्यचं ठरणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणत्या संघाला साथ देणार कोणाच्या अपेक्षांवर पाणी फेरणार हे पाहावं लागेल.

हा सामना किंग विरुद्ध प्रिन्स यांच्यात होणार आहे. एका बाजूला गुजरात टायटन्सचे कर्णधार शुभमन गिल असणार आहे. गिलला 'प्रिन्स' नावाने ओळखलं जातं. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा किंग म्हटला जाणारा आरसीबीचा अनुभवी विराट कोहली असणार आहे. पॉइंट टेबलमध्ये आरसीबी अव्वल स्थानी आहे. बंगळुरुने मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. तर गुजरातने २ पैकी १ सामना जिंकला. यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

RCB vs GT Pitch Report
RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की गुजरात टायटन्स कोण मारणार बाजी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड अन् संभाव्य प्लेइंग-११

एम चिन्नास्वामी स्टेडियमचा आयपीएल रेकॉर्ड काय?

बंगळुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडियम, हे तेच स्टेडियम आहे, जेथे ख्रिस गेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केलीय. या स्टेडियममध्ये ख्रिस गेलने १७५ धावा केल्या आहेत. तर संघाची एकूण सर्वाधिक धावसंख्या २८७ आहे. ही धावसंख्या हैदराबादच्या संघाने आरसीबीविरुद्धात उभारली होती. तर सर्वात कमी धावसंख्या ८२ आहे. या धावा आरसीबीने केकेआरविरुद्ध केल्या होत्या.

RCB vs GT Pitch Report
IPL 2025 LSG vs PBKS: अप्रतिम! बिश्नोई-बदोनीच्या जोडीची कमाल,बाउंड्रीवर टिपला उत्कृष्ट झेल|Video Viral

या स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण ९५ सामने खेळले गेलेत. या स्टेडियमचा रेकॉर्ड खूप धक्कादायक आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४१ सामने जिंकलेत. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ५०वेळा विजय मिळवलाय. हे झालं फलंदाजी आणि गोलंदाजीविषयी आता नाणेफेक बाबतही या स्टेडियमचा इतिहास पहा. या स्टेडियमवर ज्या कर्णधाराने त्याचा विजय पक्का समजला जातो. आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने ५० वेळा सामना जिंकला आहे.

कोणाला मिळेल फायदा?

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वोच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त आहे. वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना येथे अधिक मदत मिळेल. ४० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल. जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २२० धावा केल्या नाहीत तर त्यांना सामना जिंकणं कठिण जाईल.

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यात वरुणराजा व्यत्यय आणणार नाही. आकाशात हलके ढग असले तरी पाऊस पडेल असा अंदाज नाहीये. येथील तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com