Virat Kohli Viral Video: लाईव्ह सामन्यात विराट अंपायरशी भिडला! नेमकं काय घडलं? पाहा Video

RCB vs DC,Virat kohli Latest News In Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४७ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे.
RCB vs DC Virat kohli heated argument with umpire over abhishek porel wicket video viral
RCB vs DC Virat kohli heated argument with umpire over abhishek porel wicket video viraltwitter

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४७ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहली थेट अंपायरशी भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली अंपायरशी चर्चा करताना दिसून येत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. तर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून अभिषेक पॉरेल फलंदाजी करत होता. सिराजच्या षटकातील पहिलाच चेंडू अभिषेक पॉरेलच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील खेळाडूंनी जोरदार अपील केली. मात्र अंपायरने नॉटआऊट दिल्यानंतर हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्यात आला.

RCB vs DC Virat kohli heated argument with umpire over abhishek porel wicket video viral
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीचा पराभव का झाला? कारण सांगतांना संतापला कर्णधार अक्षर पटेल

तिसऱ्या अंपायरनेही त्याला नॉटआऊट घोषित केलं. अंपायरने दिलेल्या निर्णयानुसार, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी त्याच्या बॅटला लागला होता. त्यामुळे त्याला नॉटआऊट घोषित केलं गेलं. अंपायरच्या या निर्णयावरुन कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली नाराज असल्याचे दिसून आले. हा निर्णय आल्यानंतर दोघांमध्येही दिर्घकाळ चर्चाही झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

RCB vs DC Virat kohli heated argument with umpire over abhishek porel wicket video viral
IPL 2024 Points Table: RCB च्या विजयाने CSKचं टेन्शन वाढलं! पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर रजत पाटीदारच्या शानदार फलंदाजी आणि यश दयालच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून रजत पाटीदारने ५२ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १८७ वर पोहचवली. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव १४० धावांवर आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com