RCB vs DC, Pitch Report: बंगळुरुची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा RCB vs DC सामन्याचा पिच रिपोर्ट

RCB vs DC Pitch Report, Match Details: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.
RCB vs DC, Pitch Report: बंगळुरुची खेळपट्टी कोणाला देणार साथ?  पाहा RCB vs DC सामन्याचा पिच रिपोर्ट
RCB vs DC pitch report royal challengers bengaluru vs delhi capitals pitch report news amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशह महत्वाचा असणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल जाणून घ्या.

हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. रॉयल चॅलेजर्स बंगळुरु संघाचा रेकॉर्ड पाहिला तर , या मैदानावर खेळलेल्या ५ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर खेळताना सरासरी धावसंख्या ही १६८ इतकी राहिली आहे. या मैदानावर जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. याच मैदानावर खेळताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकात २८० धावांचा डोंगर उभारला होता.

RCB vs DC, Pitch Report: बंगळुरुची खेळपट्टी कोणाला देणार साथ?  पाहा RCB vs DC सामन्याचा पिच रिपोर्ट
CSK vs RR, IPL 2024: चेन्नई - राजस्थान सामन्यावर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास काय होणार?

एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील संपूर्ण आकडेवारी...

सामने- ९३

प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने -३९

धावांचा पाठलाग करताना जिंकलेले सामने - ५०

नाणेफेक जिंकून जिंकलेले सामने - ५०

नाणेफेक गमावून जिंकलेले सामने -३९

सर्वोच्च धावसंख्या - ३ गडी बाद २८७ धावा

पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या - १६८ धावा

धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या - १८६ धावा

RCB vs DC, Pitch Report: बंगळुरुची खेळपट्टी कोणाला देणार साथ?  पाहा RCB vs DC सामन्याचा पिच रिपोर्ट
IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११-

फाफ डू प्लेसिस (कर्णधार) विराट कोहली,विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक,स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल।

इम्पॅक्ट प्लेयर: महिपाल लोमरोर

दिल्ली कॅपिटल्स- जेक फ्रेजर मॅकगर्क, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, डेविड वॉर्नर/शाई होप, ट्रीस्टन स्टब्स, गुलबदीन नायब/झाय रिचर्डसन, अक्षर पटेल (कर्णधार) रसिख सलाम, कुलदीप यादव,मुकेश कुमार, खलिल अहमद

इम्पॅक्ट प्लेअर - इशांत शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com