Ravindra Jadeja Fitness Update : रविंद्र जडेजाच्या फिटनेसवर मोठी अपडेट, कधी करणार पुनरागमन?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्याचवेळी रविंद्र जडेजाच्या फिटनेसबाबत नवी माहिती समोर आली आहे.
Ravindra Jadeja Fitness Update
Ravindra Jadeja Fitness UpdateSAAM TV
Published On

Ravindra Jadeja Fitness Update In Marathi : भारतीय क्रिकेट संघासाठी पुढील काही महिने अत्यंत महत्वाचे आहेत. भारत वनडे वर्ल्डकपचं यजमानपद भूषवणार आहे. त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं आव्हान आहे. फायनलसाठी पात्र व्हायचे आहे. त्याचवेळी रविंद्र जडेजाच्या फिटनेसबाबत नवी माहिती समोर आली आहे.

टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान कोणत्याही परिस्थितीत पार करायचं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ आधीच टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

Ravindra Jadeja Fitness Update
India vs Bangladesh 1st Test: कुठलाही विजय सहजरीत्या मिळत नाही, विरोधी टीम चांगली खेळली; विजयानंतर केएल राहुल म्हणाला...

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ , मार्नश लाबुशेनसारख्या तगड्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान भारतीय फिरकीपटूंचं त्रिकूट आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलसमोर आहे. मात्र, काही महिन्यांपासून जडेजाच्या फिटनेसबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आशिया चषक स्पर्धेदरम्यान रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर होते. मध्यंतरी त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. टेस्ट चॅम्पियनशिपच्या आधी जडेजा दुखापतीतून सावरेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता.

Ravindra Jadeja Fitness Update
Rishabh Pant : अपघातानंतर रिषभ पंत 'इतके' दिवस मैदानाबाहेर; ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेलाही मुकणार? समोर आली माहिती

जडेजावर शस्त्रक्रियाही झाली होती

जडेजावर शस्त्रक्रियाही झाली होती. आता तो दुखापतीतून सावरत आहे. तो बांगलादेश दौऱ्यावरही गेला नव्हता. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमध्येही तो खेळू शकला नाही. जडेजा मैदानावर कधी परतेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अनुभवी गोलंदाज आर अश्विनने त्याच्या वापसीचे संकेत दिले आहेत.

लवकरच पुनरागमन

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या दृष्टीने सुरू असलेल्या तयारीबाबत आर अश्विननं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जडेजाच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जडेजा तयार असेल अशी अपेक्षा आहे, असं अश्विन म्हणाला होता. या मालिकेसाठी तो खूप मेहनत घेत आहे. वर्षभरापासून योग करत आहे. फलंदाजीच्या कौशल्यावरही काम करत आहे, असंही तो म्हणाला.

दुखापतग्रस्त जडेजा मागील वर्षी बराच वेळ मैदानाबाहेर

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा दुखापतीमुळं २०२२ मध्ये बराच काळ मैदानाबाहेरच होता. पण जेवढे सामने तो खेळला, त्या सर्व सामन्यांत त्याने छाप सोडली होती. जडेजाने कसोटीच्या ५ डावांत ८२ च्या सरासरीने ३२८ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. त्याने १० विकेट घेतल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com