India vs Bangladesh 1st Test: कुठलाही विजय सहजरीत्या मिळत नाही, विरोधी टीम चांगली खेळली; विजयानंतर केएल राहुल म्हणाला...

Captain K L Rahul: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १८८ धावांनी जोरदार विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
Captain K L Rahul
Captain K L RahulTwitter/@BCCI
Published On

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १८८ धावांनी जोरदार विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना मिरपूरच्या मैदानावर पार पडणार आहे. हे मैदान भारतीय संघासाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण याच मैदानावर भारतीय संघाला सलग २ वनडे सामने गमवावे लागले होते. मात्र पहिल्या सामन्यात जोरदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल असा विश्वास भारतीय कर्णधार केएल राहुलने व्यक्त केला आहे. तसेच त्याने रोहित शर्मा लवकरच संघात पुनरागमन करणार असल्याचे देखील संकेत दिले आहेत. (Cricket News In Marathi)

Captain K L Rahul
Fifa World Cup: मस्तीखोर रणवीरची चाहत्यासाठी 'एक स्माईल प्लिज', फिफा वर्ल्ड कपमध्ये रणबीर- दीपिकाचे व्हिडीओ व्हायरल...

कसोटी क्रिकेटमध्ये १८८ धावांनी विजय मिळवणे ही खूप मोठी बाब आहे. मात्र हा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला (Team India) भरपूर संघर्ष करावा लागला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी जेव्हा बांगलादेश संघातील फलंदाज फलंदाजी करत होते त्यावेळी भारतीय गोलंदाजांना गडी बाद करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत बोलताना केएल राहुल म्हणाला की,"तुम्हाला कुठलाही विजय सहजरीत्या मिळत नाही. आम्ही पुरेसे कसोटी क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे की, खेळात असा एक टप्पा येतो जेव्हा विरोधी संघ देखील चांगला खेळ करत असतो. आपण त्याचा आदर केला पाहिजे आणि आपले काम करत राहिले पाहिजे. मला अभिमान वाटतो की, संपूर्ण सामन्यात आमची उर्जा आणि तीव्रता खूप जास्त होती ती आम्ही दिवसभर राखली." (Latest Marathi News)

भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी कुलदीप यादव, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांना मोलाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. कुलदीप यादवने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कुलदीपच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने बांगलादेश संघाचा डाव अवघ्या ५५.५ षटकांमध्ये संपवला. त्यानंतर दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

Captain K L Rahul
Lionel Messi Lovestory: बालपणीच्या मैत्रिणीवरचं जडला जीव, लियोनेल मेस्सीची हटके लवस्टोरी

का ठरतेय अक्षर पटेलची कामगिरी खास?

कुलदीप यादव या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. मात्र त्याला अक्षर पटेलने देखील उत्तम साथ दिली. अक्षर पटेलने दोन्ही डावात मिळून ५ गडी बाद केले. दरम्यान दुसऱ्या डावात तैजुल इस्लामला बाद करताच, त्याने आर अश्विनला मागे सोडलं आहे. तो ७ कसोटी सामने खेळल्यानंतर सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ कसोटी सामन्यांमध्ये १३ च्या सरासरीने ४४ गडी बाद केले आहेत. हा त्याचा भारताबाहेरील पहिलाच कसोटी सामना होता. परिस्थिती वेगळी असताना देखील त्याने स्वतःवर कुठलाही दबाव येऊ दिला नाही. त्यामुळे भारतीय संघाला रवींद्र जडेजाची कमतरता जाणवली नाही. येणाऱ्या सामन्यांमध्ये देखील अक्षर पटेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com