Ravi Shastri On Cheteshwar Pujara: 'त्याला ऑफ स्टंप कुठेय हे तरी माहितेय का?..' पुजाराच्या विकेटवर दिग्गज खेळाडू भडकला

Cheteshwar Pujara Wicket: संघातील वरिष्ठ खेळाडू बाद झाल्यानंतर दिग्गज खेळाडूने मोठं वक्तव्य केलं आहे.
cheteshwar pujara
cheteshwar pujarasaam tv
Published On: 

IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा टॉप ऑर्डर फ्लॉप ठरला आहे. अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुरला वगळलं तर इतर कुठलाही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही.

त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू बाद झाल्यानंतर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

cheteshwar pujara
WATCH WTC Final: वातावरण तापलं! गोलंदाजीला सज्ज झालेल्या सिराजला स्मिथने अचानक थांबवलं; पुढे जे झालं.. -VIDEO

हा खेळाडू बाद होताच रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य...

पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा ज्या पद्धतीने बाद झाला आहे, ते पाहून रवी शास्त्री नाराज झाले आहेत. चेतेश्वर पुजाराला कॅमेरून ग्रीनने बाद करत माघारी धाडले. त्याने टाकलेला चेंडू पुजाराने सोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र टप्पा पडताच चेंडूने काटा बदलत आत आला आणि पुजाराची दांडी उडवून गेला. पुजारला या डावात अवघ्या १४ धावा करता आल्या.

काय म्हणाले रवी शास्त्री?

रवी शास्त्री म्हणाले की, ' गिल युवा फलंदाज आहे, तो चुका करून शिकेल. मात्र पुजारा कडून योग्य शॉट सिलेक्शनची अपेक्षा होती. गेले काही महिने पुजारा इंग्लंडमध्ये होता. तो ससेक्स संघासाठी काउंटी चॅम्पियनशिप खेळत होता. एप्रिल २०२३ पासून त्याने ३ शतके आणि १ अर्धशतक झळकावले आहे.' (Latest sports updates)

याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' त्याचा फ्रंटफूट व्यवस्थित नव्हता. त्याने चेंडू जवळ जायला हवं होतं. त्याने शॉट खेळण्याचं ठरवलं होतं, शेवटी त्याने चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. तुम्ही पाहू शकता, जेव्हा त्याने चेंडू सोडला तेव्हा त्याचा ऑफ स्टंप दिसत होता. त्याचा फ्रंट फूट मिडल स्टंप जवळ होता. जो ऑफ स्टंप जवळ असायला हवा होता. त्याला वाटलं की, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाईल. त्याचा हा निर्णय चुकला.'

तसेच शुभमन गिलच्या विकेटवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, ' आम्ही इंग्लंडमध्ये बॉल कसा सोडायचा यावर चर्चा करतो आणि आपला ऑफ स्टंप कुठे आहे यावरही चर्चा करतो. पुजाराला तर माहीतंच नव्हतं त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे. शुभमन गिलने फुटवर्कच्या बाबतीत आळस केला. तो युवा खेळाडू आहे. तो लवकरच शिकेल. मात्र पुजारा हे पाहून नक्कीच निराश झाला असेल. त्याचा फ्रंट फूट चेंडूच्या दिशेने जायला हवा होता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.