Mohammed Shami News In Marathi: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तो केव्हा परतणार? याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर तो पूर्णपणे फिट झाला असून मैदानात परतला आहे.
त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल वर्षभरानंतर मैदानात उतरलेल्या शमीने बंगालकडून खेळताना पहिल्याच सामन्यात ४ गडी बाद केले आहेत. त्याच्या या शानदार गोलंदाजीचा व्हिडिओ बीसीसीआय डॉमेस्टीक या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
शमीने बंगालकडून खेळताना मध्यप्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यातून कमबॅक केलं आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या दिवशी १० षटकं टाकली. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.
मध्यप्रदेशने १ गडी बाद १०६ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या ६१ धावांवर मध्य प्रदेशचे ९ फलंदाज तंबूत परतले. शमीच्या पहिल्या डावातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ४ निर्धाव षटकं फेकत ४ गडी बाद केले. शमीचं कमबॅक ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.
या मालिकेसाठी शमीला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र असं म्हटलं जात आहे की, मालिकेतील शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी शमीचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. आता बीसीसीआय त्याच्यावर विश्वास दाखवणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकिपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्म सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.