IPL 2025 Mega Auction: टीम इंडियाला नडणारा हा गोलंदाज लिलावात भाव खाणार! डेल स्टेनची मोठी भविष्यवाणी

Marco Jansen: येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा पार पडणार आहे.
IPL 2025 Mega Auction: टीम इंडियाला नडणारा हा गोलंदाज लिलावात भाव खाणार! डेल स्टेनची मोठी भविष्यवाणी
south africa twitter
Published On

Dale Steyn On Marco Jansen: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत विजय मिळवला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेन भारतीय गोलंदाजांना चांगलाच नडला.

त्याने या डावात तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. या शानदार कामगिरीनंतर त्याला आयपीएल लिलावात चांगलाच भाव मिळेल, अशी भविष्यवाणी दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेनने केली आहे.

IPL 2025 Mega Auction: टीम इंडियाला नडणारा हा गोलंदाज लिलावात भाव खाणार! डेल स्टेनची मोठी भविष्यवाणी
IPL 2025, RCB: RCB या खेळाडूला घेण्यासाठी बक्कळ पैसा मोजणार! कॅप्टन्सीही देणार; रेकॉर्ड एकदा पाहाच

येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दामध्ये आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात मार्को यान्सेनची बेस प्राईज १.२५ कोटी रुपये इतकी असणार आहे आता डेल स्टेनच्या मते त्याच्यावर लिलावात मोठी बोली लागू शकते. स्टेनने आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत लिहिले की, 'मार्को यान्सेनला १० कोटी रुपये मिळणार? मला तरी हेच वाटतं..'

डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज आहे. त्याच्या मते मार्को यान्सेनला लिलावात मोठी बोली लागू शकते. कारण त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

IPL 2025 Mega Auction: टीम इंडियाला नडणारा हा गोलंदाज लिलावात भाव खाणार! डेल स्टेनची मोठी भविष्यवाणी
IPL 2025 Mega Auction: ना बटलर, ना स्टार्क; मेगा ऑक्शनमध्ये हा स्टार ऑलराऊंडर करणार मार्केट जाम

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात २८ धावा खर्च करत १ गडी बाद केला. यासह फलंदाजी करताना त्याने १६ चेंडूंचा सामना करत दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. या डावात त्याने ५१ धावांची खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

IPL 2025 Mega Auction: टीम इंडियाला नडणारा हा गोलंदाज लिलावात भाव खाणार! डेल स्टेनची मोठी भविष्यवाणी
IPL 2025: गेल्या हंगामातील कोट्याधीश, आगामी हंगामात या 5 खेळाडूंना Base Price मिळणंही कठीण

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकअखेर २१९ धावा करता आल्या. भारतीय संघाकडून तिलक वर्माने शतकी खेळी केली. तर अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावलं. या धावांचा बचाव करताना भारताने ११ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com