Prithvi Shaw Statement: 'टीम इंडियासाठी World Cup जिंकणे हेच माझे ध्येय' संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉचे लक्षवेधी विधान

Prithvi Shaw Want Team India to Win World Cup: पृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे.
prithvi shaw
prithvi shawsaam tv
Published On: 

Prithvi Shaw On Comeback In Team India: भारतीय संघातील आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ हा आपल्या मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेर घडणाऱ्या प्रकरणांमुळे जास्त चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच एका महिलेने त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता.

मात्र या प्रकरणात त्याला क्लीन चिट मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात पृथ्वी शॉला स्थान दिलं गेलं नाही. दरम्यान याबाबत बोलताना त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

prithvi shaw
Ashish Sakharkar Passes Away: मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्सचा मान पटकावणाऱ्या मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन

याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'काही लोक म्हणत होते की, फिटनेसमुळे मला संघात स्थान दिलं गेलं नाही. मात्र मी NCA मधून फिटनेसच्या सर्व टेस्ट पास करून आलो आहे. त्यानंतर धावा केल्या आणि टी -२० संघात कमबॅक केलं. मात्र मला वेस्टइंडीज दौऱ्यासाठी स्थान मिळालं नाही.' (Prithvi Shaw)

भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे..

पृथ्वी शॉला भारतीय संघासाठी कमीत कमी १२ ते १४ वर्ष खेळायचं आहे. तसेच वर्ल्डकप देखील जिंकून द्यायचा आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की,' मला भारतीय संघासाठी कमीत कमी १२-१४ वर्ष खेळायचं आहे. मला भारतीय संघासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे. त्यासाठीच ही मेहनत सुरु आहे. हेच माझं लक्ष्य आहे. मी ते मिळवणारच. ते मिळवण्यासाठी मला कसून मेहनत करण्याची आणि धावा करण्याची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार.' (Latest sports updates)

prithvi shaw
Team India Playing 11: आता विंडीजचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात धाकड खेळाडूची एंट्री; पाहा प्लेइंग 11

भारतीय संघात कमबॅक करणं कठीण...

पृथ्वी शॉ जुलै २०२१ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचे भारतीय संघात कमबॅक करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

येत्या काही दिवसात आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी देखील त्याला संघात स्थान मिळणं कठीण दिसून येत आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंड संघाविरुद्ध टी -२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली, तर पृथ्वी शॉला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com