Vinod Kambli: माझ्या भावासाठी प्रार्थना करा...! विनोद कांबळीची तब्येत बिघडली; भावाने दिली हेल्थ अपडेट

Vinod Kambli health update: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) यांच्या तब्येतीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली असल्याचं त्याच्या भावाने सांगितलंय.
Vinod Kambli
Vinod Kamblisaam tv
Published On

भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबली काही काळापासून आजारी आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याला यूरिन इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तो घरी परतला होता. दरम्यान पुन्हा एकदा त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. यावेळी त्याच्या धाकट्या भावाने, वीरेंद्र कांबळीने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

वीरेंद्रने सांगितलं की, विनोद अजूनही नीट बोलू शकत नाहीत आणि त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, अशी विनंती त्याने चाहत्यांना केली.

सध्या कशी आहे तब्येत?

वीरेंद्रने सांगितलं की, विनोद सध्या घरी आहे. त्याची तब्येत स्थिर आहे मात्र अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बोलताना त्याला त्रास होतो. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तो एक चॅम्पियन आहे. लवकरच तो पूर्ण बरा होईल, चालू लागेल आणि आशा आहे की पुन्हा एकदा मैदानावर दिसेल," असं वीरेंद्र म्हणालाय.

Vinod Kambli
India vs Pakistan Cricket Match: गुड न्युज! भारत - पाकिस्तान संघ ५ सामने खेळण्यासाठी येणार आमने सामने; जाणून घ्या केव्हा

झालेले तपास आणि उपचार

वीरेंद्रच्या म्हणण्यानुसार, विनोद कांबळीने 10 दिवस रिहॅब केला. त्याचं पूर्ण बॉडी चेकअप करण्यात आलंय. यामध्ये ब्रेन स्कॅन आणि युरिन टेस्टही करण्यात आली. सध्या तो चालू शकत नाही त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपी सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. अजूनही त्याचं बोलणं स्पष्ट नाहीये.

Vinod Kambli
Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

वीरेंद्र म्हणाला, "मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्या भावासाठी प्रार्थना करा. तो लवकर बरा होण्यासाठी त्याला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे."

विनोद कांबली आणि सचिन तेंडुलकर ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावं आहेत. 1980 च्या उत्तरार्धात आणि 1990 च्या सुरुवातीला या दोघांनीही आपला खेळ दाखवून दिला. मात्र, त्यापैकी केवळ सचिननेच मोठं आणि दीर्घ क्रिकेट करिअर घडवलं. कांबलीबद्दल तज्ज्ञांचं मत होतं की, तो सचिनपेक्षाही जास्त प्रतिभावान होता, पण आपली क्षमता तो पूर्णपणे दाखवू शकला नाहीत.

Vinod Kambli
India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

या विषयी बोलताना वीरेंद्र म्हणाला, "दोघांमध्ये सारखीच प्रतिभा होती. माझा भाऊ सचिनपेक्षा मोठा आहे किंवा सचिन त्याच्यापेक्षा मोठा आहे, असं मी कधी ऐकलं नाही. विनोदने स्वतःलाही कधीच सचिनपेक्षा मोठं मानलं नाही. सचिन दादा नेहमीच विनोदच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे. सचिन नेहमीच अँड्रियाला फोन करून विनोदच्या तब्येतीची चौकशी करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com