
सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी
पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार आहे. क्रीडा मंत्रालयानं यासाठी हिरवा कंदील दिला आहे. गृह आणि परराष्ट्र मंत्रालयानेही पाक संघाला भारतात यायला मंजुरी दिलीय. मुळात 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाली होती. मात्र आता आशिया कप व्यतिरिक्त, पाकिस्तानच्या संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय.
दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानबद्दल संतापाची भावना आहे, असं म्हणत ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी X पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केलीय. “त्यांनी धर्म विचारून आपली माणसे मारायची आणि केंद्र सरकारने पाकिस्तानी संघ खेळायला बोलवायचे! पहलगाम हल्ल्यातील लोकांचे रक्तही वाळले नसेल अजून की केंद्राने पाकिस्तानी टीमला पायघड्या घातल्या. असे असेल तर हे न खपणारे आहे. #ऑपरेशन_सिंदूर नंतर हेच यांचे ‘न्यू नॉर्मल’ आहे का?”
मुळात बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतिस्पर्धी देशाला सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तर यजमान देशाला पुन्हा भविष्यात यजमानपदाची संधी मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्याची संधी देण्यात आली असल्याची चर्चा आहे. मात्र याचं पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची परवानगी मिळणार का? याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलयं. मात्र पाकड्यांना भारताच्या भूमीत खेळण्यासाठी बोलवणं किती योग्य आहे? असा सवाल भारतीयांकडूनही विचारला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.