PBKS vs RR : यशस्वी जयस्वालच्या विकेटनंतर अजब-गजब सेलिब्रेशन, पंजाबच्या फॅनची सोशल मीडियावर चर्चा

PBKS vs RR Match : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यान पंजाबच्या मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ज्या वेळेस यशस्वी जयस्वाल बाद झाला, तेव्हा ही मिस्ट्री गर्ल स्टेडियमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
PBKS vs RR Match
PBKS vs RR Matchx
Published On

PBKS vs RR IPL 2025 : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाने २० ओव्हर्समध्ये २०५ धावा केल्या. सामन्यामध्ये राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वात जास्त ६७ धावा केल्या.

सलामीला आल्यापासून यशस्वी जयस्वाल संयम दाखवत फलंदाजी करत होता. सुरुवातीला त्याला कर्णधार संजू सॅमसनची साथ मिळाली. एका वेळेला संजू आणि यशस्वीने सामना राजस्थानच्या बाजून झुकवला होता. संजू बाद झाल्यानंतर मग यशस्वी टिकून राहिला. पण तेराव्या ओव्हरमध्ये त्याला लॉकी फर्ग्युसनने बाद केले.

PBKS vs RR Match
Sanju Samson : विकेट पडल्यावर संजू सॅमसनला राग अनावर, बॅटसोबत गैरवर्तन; Video व्हायरल

सेट झालेला यशस्वी जयस्वाल बाद होऊन माघारी परतल्यानंतर पंजाबचे फॅन्स आनंदात घोषणा करु लागले. त्या वेळेस स्टेडियममधील कॅमरा चाहत्यांचे क्षण टिपू लागला. त्याच दरम्यान पंजाब संघाच्या फॅनने सर्वांचे लक्ष वेधले. मिस्ट्री गर्लचे विकेट सेलिब्रेट करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॅन्ससह पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा आजचा सामना पाहण्यासाठी आली आहे. ज्यावेळेस जयस्वाल बाद झाला, तेव्हा प्रीती झिंटाच्या गालावरची खळी आनंदाने खुलली. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.

PBKS vs RR Match
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालच्या गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयावर आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य, 'त्याने पैशांसाठी...'

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा

PBKS vs RR Match
CSK VS DC Highlights : थाला नही चला... शेवटपर्यंत धोनी मैदानात असतानाही चेन्नईचा पराभव, दिल्लीचा सलग तिसरा विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com