पाकिस्तान सुपर लीग २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कराचीमध्ये पार पडला. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड संघाने जेतेपदाला गवसणी घालत तिसऱ्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने अष्टपैलू कामगिरी केली. दरम्यान तो आपल्या कामगिरीसह आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय, ज्यात तो धूम्रपान करताना दिसून येत आहे.
या स्पर्धेतील फायनलमध्ये फलंदाजी करत असलेल्या मुल्तान सुल्तानने १७ षटकअखेर ९ गडी बाद १२७ धावा केल्या होत्या. त्यावेळी कॅमेरामनने कॅमेरा ड्रेसिंग रुमच्या दिशेने वळवला. त्यावेळी इमाद वसीम धूम्रपान करताना दिसून आला. यावरुन या स्पर्धेचा दर्जा दिसून येतो अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
इमादने या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात २३ धावा खर्च करत २३ धावा खर्च केल्या. ही त्याची पीएसएल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तर धावांचा पाठलाग करताना त्याने १७ चेंडूत १९ धावांची खेळी केली. या शानदार कामगिरीच्या बळावर त्याने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. दरम्यान त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. (Cricket news in marathi)
इमाद वसीमबद्दल बोलायचं झालं तर त्याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५५ वनडे सामन्यांमध्ये ४२.८७ च्या सरासरीने ९८६ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याने ४४ गडी बाद केले. तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ४८६ धावा करत ६५ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.