Shreyanka Patil Record: श्रेयंका पाटीलचा कहर! WPL मध्ये असा कारनामा करणारी ठरली पहिलीच गोलंदाज

WPL Final 2024: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
shreayanka patil
shreayanka patiltwitter
Published On

Shreyanka Patil, WPL Final 2024:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर शानदार विजय मिळवत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. दरम्यान या विजयात मराठमोळ्या श्रेयंका पाटीलने शानदार कामगिरी करत इतिहासाला गवसणी घातली आहे.

श्रेयंका पाटीलने रचला इतिहास..

या सामन्यात २१ वर्षीय श्रेयंका पाटीलने अप्रतिम गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून गोलंदाजी करताना श्रेयंका पाटीलने ३.३ षटकात अवघ्या १२ धावा खर्च करत दिल्लीच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. यासह वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या फायनलमध्ये ती सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारी गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड मुंबई इंडियन्स संघातील गोलंदाज हेली मॅथ्यूजच्या नावावर होता. हेली मॅथ्यूजने २०२३ मध्ये झालेल्या फायनलच्या सामन्यात ४ षटक टाकून ५ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. (Cricket news in marathi)

shreayanka patil
IND vs ENG Test Series: भारतात इंग्लंडचा दारुण पराभव का झाला? माजी खेळाडूने सांगितलं कारण

आरसीबीच्या गोलंदाजांचा कहर..

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील गोलंदाज चमकले. श्रेयंका पाटीलसह सोफी मोलिनूने देखील शानदार गोलंदाजी केली. तिने ४ षटकात २० धावा खर्च करत ३ गडी बाद केले. मुख्य बाब तिने या तिन्ही फलंदाजांना एकाच षटकात बाद केलं. सोफी गोलंदाजीला येण्यापूर्वी दिल्लीचा संघ ड्राईव्हिंग सिटवर होता. त्यानंतर ती गोलंदाजीला आली आणि सामना एकाच षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या दिशेने वळवला.

shreayanka patil
IPL 2024: IPL आधीच मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं! संघातील हुकमी एक्का दुखापतग्रस्त

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा शानदार विजय...

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा पहिला डाव अवघ्या ११३ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ३ चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com