No Handshake Ind vs Pak : पाकिस्तानला पराभव सहन झालाच नाही, रडगाणं सुरू; नो हँडशेक जिव्हारी लागल्यानं भारताची तक्रार

No Handshake Controversy: आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. हा पराभव पाकिस्तान संघाच्या पचनी पडला नाही. नो हँडशेकवरून आता त्यांनी भारतीय संघाची तक्रार केल्याचे वृत्त आहे.
India vs Pakistan
India vs Pakistan saam tv
Published On

आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांत झालेल्या सामन्यानंतर 'नो हँडशेक' वाद उफाळून आला आहे. सूर्यकुमार विजयी षटकार मारल्यानंतर मैदानातून बाहेर जाताना पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवला नाही. त्यामुळं पाकिस्ताननं आता रडगाणं सुरू केलं आहे. पाकिस्तानी संघ व्यवस्थापनानं यावरून भारतीय संघातील खेळाडूंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

भारतीय संघानं जबरदस्त खेळ करत तुलनेनं दुबळ्या दिसणाऱ्या पाकिस्तान संघाला धूळ चारली. पाकिस्तानचा सात गडी राखून दारूण पराभव केला. सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना हात मिळवला नाही. भारतीय क्रिकेटपटूंचा हा 'अॅटिट्यूड' भारतीयांना सॉलिड भावला. दुसरीकडं पाकिस्तानला हा पराभव आणि हात न मिळवणे खूप झोंबले आहे. त्यांनी 'नो हँडशेक'वरून भारतीय संघाविरोधात तक्रार केली आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना सामन्यानंतर हस्तांदोलन केलं नाही. ही बाब पाकिस्तान संघ व्यवस्थापनाच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि सामनाधिकारी (मॅच रेफरी) अँडी पीक्रॉफ्ट यांच्याकडं भारतीय संघाविरोधात अधिकृतरित्या तक्रार केली आहे.

भारतीय खेळाडूंकडून अशा प्रकारे हस्तांदोलन न करणे ही बाब खिलाडूवृत्तीच्या पूर्णपणे विरोधात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदनात म्हटलं की, संघ व्यवस्थापक नवीद चीमा यांनी हस्तांदोलन न करण्याच्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या वर्तवणुकीवर आक्षेप नोंदवला आहे. हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या कर्णधाराला सामना संपल्यानंतरच्या सोहळ्याला पाठवलं नाही.

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांनी नाणेफेकीवेळी हस्तांदोलन केले नव्हते. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टॉसवेळी सूर्यकुमारसोबत हस्तांदोलन करायचे नाही असे सामनाधिकारी पीक्रॉफ्ट यांनी आगाला सांगितल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे. पण सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यावर मनाई केली नव्हती, असेही सांगण्यात आले आहे.

विजयानंतर लगेच पव्हेलियनमध्ये परतले भारतीय खेळाडू

भारताला १२८ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. सूर्यकुमार यादवने षटकार लगावून भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर सूर्यकुमार आणि शिवम दुबे लगेच ड्रेसिंग रुममध्ये गेले. भारतीय संघातील खेळाडूंनी विजयी जल्लोष केला आणि ते ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले. पाकिस्तानचा हेड कोच माइक हैसनने सांगितले की, पाकिस्तानी खेळाडू हस्तांदोलनासाठी उभे होते, पण भारतीय संघाच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com